स्वाती मालिवाल यांना झालेल्या मारहाण प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी वैभव कुमार यांना अटक केल्याच्या निषेधार्थ रविवारी, (१९ मे) दिल्लीतील भाजपा मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल आपवर टीका करताना म्हणाल्या की, ‘जे पूर्वी दिल्लीत सामूहिक बलात्कार पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर येत असत. आज ते एका आरोपीला वाचवत आहेत.’
आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालिवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी रविवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरातून लॅपटॉप, सीसीटीव्ही फूटेज, डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर (डीव्हीआर) जप्त केले. दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरून काही कागदपत्रेही जप्त केली आहेत.
(हेही पहा – Sanjay Shirsat: खुर्चीच्या अट्टाहासामुळेच पक्षात फूट पडली, संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा )
मालिवाल यांनी केलेल्या दाव्यानुसार, १३ मे रोजी घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज हरवले असून संपादित व्हिडिओ सादर केले आहेत. केजरीवाल यांचे सहकारी वैभव कुमार यांना शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेण्यात आले आणि मारहाणीच्या प्रकरणात अटक करण्यात आली. ‘सुरुवातीला मला क्रूरपणे मारहाण करण्यात आली. त्याने मला लाथ मारली आणि मारहाण केली. जेव्हा मी स्वतःला वाचवले आणि ११२ क्रमांकावर फोन केला, तेव्हा तो बाहेर गेला. सुरक्षा कर्मचाऱ्यांना फोन केला आणि व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. मी आरडाओरडा करत होते आणि सुरक्षारक्षकाला सांगत होते की, विभवने मला निर्घृणपणे मारहाण केली आहे. व्हिडिओमधील हा भला मोठा प्रसंग संपादित करण्यात आला आहे.
मारहाणीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज हरवले
मालिवाल यांनी दावा केला की, “केवळ ५० सेकंदांचा व्हिडिओ जारी करण्यात आला. पोलीस कोठडीची मागणी करणाऱ्या याचिकेनुसार, मुख्यमंत्री निवासस्थानाच्या कनिष्ठ अभियंत्याने डी. व्ही. आर. आणि सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसवलेल्या ठिकाणी प्रवेश नसल्याचे कबूल केल्यानंतर जेवणाच्या खोलीचा व्हिडिओ दिला; परंतु नंतर तो कथित घटनेच्या वेळी रिकामा असल्याचे आढळून आले.
विभव कुमारला ५ दिवसांची पोलीस कोठडी
मालिवाल यांना झालेल्या मारहाणप्रकरणी दिल्ली न्यायालयाने कुमारला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांच्या सहाय्यकाची ७ दिवसांची कोठडी मागितली होती. दिल्ली पोलीस आणि विभव यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आदेश राखून ठेवला होता. शनिवारी, (१८ मे) रात्री उशिरा निकाल दिला होता. दिल्लीच्या न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर त्याला मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट गौरव गोयल यांच्यासमोर हजर करण्यात आले. ज्यांनी त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी आपल्या वकिलांच्या माध्यमातून मारहाण प्रकरणात चौकशीसाठी कुमारच्या ७ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक कुमार यांनी १३ मे रोजी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मालिवाल यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
स्वाती मालिवाल मारहाण प्रकरण
मालिवाल यांनी आरोप केला आहे की, कुमारने त्यांना ७-८ वेळा थप्पड मारली, तसेच छातीवर, पोट आणि ओटीपोटावर लाथ मारली आणि तिला ठार मारण्याची धमकी दिली. १३ मे रोजी त्या केजरीवाल यांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानी भेटायला गेल्या होत्या. तेव्हा ही घटना घडल्याचे त्यानी सांगितले. दरम्यान, ‘आप’ ने हे आरोप फेटाळले आहेत आणि दावा केला आहे की, त्यांच्या कटात सहभागी होण्यासाठी भाजपाकडून मालिवाल यांना ‘ब्लॅकमेल’ केले जात आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (विनयभंग करण्याच्या हेतूने महिलेवर हल्ला किंवा फौजदारी बळजबरी) ५०६ (गुन्हेगारी धमकी) ५०९ (शब्द, हावभाव किंवा स्त्रीच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या हेतूने कृती) अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी शनिवारी कुमारला अटक केली.
हेही पहा –