Pune News: पुणे हादरलं! बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडलं

पुण्यातील कल्याणी नगर परिसरात पोर्शे गाडीने दोन तरुणांना चिरडलं आहे. या अपघातात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात एका मुलाचा आणि एका मुलीचा समावेश आहे.

263
Pune News: पुणे हादरलं! बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडलं

पुणे शहरात अनेकवेळा वाहनचालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहने चालवतात. त्यामुळे मागील काही दिवसांपासून पुण्यात वाहनांचे अपघात (Pune City Vehical Accident) होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहन चालवण्यासाठी वाहन चालकांचं वय हे किमान १८ वर्षे पूर्ण असावं असा असा भारत सरकारचा नियम आहे. मात्र पुण्यातील कल्याणीनगरच्या (kalyaninagar Pune) परिसरात एक अल्पवयीन तरुणाने पोर्शे कारने (Porsche car accident) दोघांना चिरडले. पोर्शे गाडीचा वाहन चालक हा अल्पवयीन असून १७ वर्षांचा होता. या अपघातात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे. (Pune News)       

(हेही वाचा – Swati Maliwal Attack Case: केजरीवाल यांच्या घरातून कागदपत्रे आणि लॅपटॉप जप्त, मालिवाल यांची पक्षावर टीका)

शनिवारी रात्री उशिरा झालेल्या विचित्र अपघातात एका तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला आहे. वेदांत अगरवाल (रा. ब्रम्हा सनसिटी) याने पोर्शे Porsche कारने मोटारसायकल आणि इतर वाहनांना धडक दिली. शहरातील काही पब्स रात्री उशिरापर्यंत सुरु होते. कल्याणीनगर मधील Ballr पब (Baller Pub) मधून हे तरुण तरूणी आणि त्यांचे मित्र मैत्रिणी पार्टी संपल्यानंतर बाहेर पडले होते. तेव्हा रात्री उशिरा ३ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास कल्याणीनगरमध्ये हा अपघात झाला. पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा ती अलिशान कार चालवत असल्याचं समोर आलं आहे. अपघातानंतर नागरिकांनी कार चालकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

(हेही वाचा – Swati Maliwal Attack Case: केजरीवाल यांच्या घरातून कागदपत्रे आणि लॅपटॉप जप्त, मालिवाल यांची पक्षावर टीका)

तर अनिस अहुदिया, अश्विनी कोस्टा असं मृत्यू झालेल्या तरुण तरुणीची नावं आहेत. घटनास्थळी रात्री उशिरा पोलीस दाखल झाले आणि पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार (Commissioner of Police Amitesh Kumar) यांनी पब, हुक्का बार आणि अवैद्य धंद्यावर कडक निर्बंध घातले आहेत. तरी देखील काही काही पब नियमांना फाट्यावर मारत रात्री उशिरा पर्यंत सुरू राहतात. मद्यपान करून आल्यानंतर तरुण-तरुणी शुद्धीत नसल्यावर गाडी वेगाने चालवतात आणि अपघात घडतात.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.