Indian Meteorological Department: मान्सून निकोबारमध्ये पोहोचला, महाराष्ट्रात कधी येणार?

एल निनो आणि ला निना या दोन हवामान पद्धती आहेत.

164
Rain Alert: पुण्यात मुसळधार, तर सिंधुदुर्गात रेड अलर्ट; कोणत्या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा? जाणून घ्या..

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मान्सून अंदमान-निकोबारमध्ये पोहोचला आहे. ३१ मेपर्यंत केरळमध्ये पोहोचेल. गेल्या वर्षीही अंदमान निकोबार बेटांवर १९ मे रोजी मान्सून दाखल झाला होता, मात्र केरळमध्ये ९ दिवस उशिरा म्हणजे ८ जूनला पोहोचला होता. (Indian Meteorological Department)

यंदा मान्सून  तारखेपूर्वीच केरळमध्ये दाखल होऊ शकतो. मात्र केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची तारीख १ जून आहे. जाहीर केलेल्या तारखेत ४ दिवसांचा फरक होण्याची शक्यता असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. २८ मे ते ३ जूनदरम्यान कधीही मान्सून दाखल होऊ शकतो. (Indian Meteorological Department)

(हेही वाचा – River Rafting Places : भारतातील प्रसिद्ध रिव्हर राफ्टिंगची ठिकाणे)

९ ते १६ जूनदरम्यान महाराष्ट्रात
आयएमडीनुसार, मान्सून ९ ते १६ जूनदरम्यान महाराष्ट्रात आणि राजस्थानमध्ये २५ जून ते ६ जुलैपर्यंत मध्य प्रदेशात पोहोचण्याची शक्यता आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये १८ ते २५ जूनपर्यंत आणि बिहार-झारखंडमध्ये १८ जूनपर्यंत पोहोचेल.

‘ला निना’ मुळे चांगल्या पावसाची शक्यता
एल निनो आणि ला निना या दोन हवामान पद्धती आहेत. गेल्या वर्षी एल निनो सक्रीय होता, तर यावेळी एल निनोची स्थिती या आठवड्यात संपली असून ३ ते ५ आठवड्यांत ला निनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी एल निनोदरम्यान नेहमीपेक्षा ९४ टक्के पाऊस कमी झाला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.