Lok Sabha Election 2024: कॉंग्रेस कार्यकर्त्यांनीच खरगेंच्या फोटोला शाई फासली

196
Lok Sabha Election 2024: कॉंग्रेस कार्यकर्त्यांनीच खरगेंच्या फोटोला शाई फासली

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींबाबत केलेल्या विधानानंतर काँग्रेसचे बंगालमधील प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी खडसावले होते. तसेच ममतांबाबतचा निर्णय हा मी आणि पक्षाचे हायकमांड घेतील, असे सुनावले होते. मात्र मल्लिकार्जुन खरगे यांनी अधीर रंजन चौधरी यांना खडसावणे पश्चिम बंगालमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फारसे रुचलेले नाही, असे दिसते आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅनरवरील कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या फोटोला शाई फासल्याची बाब समोर आली आहे. (Lok Sabha Election 2024)

कोलकाला येथील विधानभवनासमोर काँग्रेसचे अनेक बॅनर लागलेले आहेत. त्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचे फोटो आहेत. दरम्यान, रविवारी, (१९ मे) सकाळी त्या बॅनरवरील मल्लिकार्जुन खरगे यांच्या फोटोंवर शाई फासण्यात आल्याचे समोर आले. त्याच बॅनरवर राहुल गांधी तसेच सोनिया गांधी यांचेही फोटो होते, मात्र त्यांना कुठलेली नुकसान पोहोचवण्यात आल्याचे दिसून आले नाही. दरम्यान, हा प्रकार समोर येताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शाई लावलेले बॅनर तिथून तातडीने हटवण्यात आले. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – PM Narendra Modi म्हणाले काँग्रेस भ्रष्टाचाराची जननी तर झामुमोवर केली सडकून टीका )

काँग्रेसचे हायकमांड निर्णय घेतील
या संपूर्ण वादाची सुरुवात काँग्रेसचे बंगालमधील प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्याबाबत केलेल्या एका विधानापासून सुरू झाली होती. ममता बॅनर्जी यांनी एका सभेला संबोधित करताना देशात इंडि आघाडीचं सरकार स्थापन झाल्यास त्या सरकारला आपला पक्ष बाहेरून पाठिंबा देईल, असं विधान केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. त्या भाजपासोबतसुद्धा जाऊ शकतात, असे विधान अधीररंचन चौधरी यांनी केलं होतं, मात्र याबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना विचारले असता त्यांनी ममता बॅनर्जी या इंडि आघाडीसोबत आहेत तसेच आपण सरकारमध्ये सहभागी होणार असल्याचे हल्लीच सांगितलं होतं. याबाबत अधीर रंजन चौधरी हे निर्णय घेणार नाहीत, तर मी आणि काँग्रेसचे हायकमांड निर्णय घेतील. जे या निर्णयाशी सहमत नसतील, ते बाहेर जातील, असा इशारा खरगे यांनी दिला होता.

वैचारिक भूमिकेतून ममतांना विरोध
मल्लिकार्जुन खरगे यांनी दिलेल्या इशाऱ्याबाबत प्रतिक्रिया देताना अधीर रंजन चौधरी म्हणाले होते की, जी व्यक्ती पश्चिम बंगालमध्ये मला आणि आमच्या पक्षाला राजकीयदृष्ट्या संपवू पाहत आहे, अशा कुठल्याही व्यक्तीच्या बाजूने मी बोलणार नाही. ही प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याची लढाई आहे, तसेच अधीर रंजन चौधरी पुढे म्हणाले की, माझ्या वैचारिक भूमिकेमधून माझा ममता बॅनर्जी यांना विरोध आहे. तो व्यक्तिगत विरोध नाही. ममता बॅनर्जी यांच्याबाबत मला कुठलाही वैयक्तिक राग नाही, मात्र मी त्यांच्या राजकीय नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करतो, असे अधीर रंजन चौधरी म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.