नाशिक जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या वतीने 124 नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातील 25 मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून या सीसीटीव्ही कॅमेरांच्या माध्यमातून आपल्या मतदान केंद्रांवर किती गर्दी आहे हे मतदारांना बघता येणार आहे. (Lok Sabha Election 2024)
शहरात ज्या मतदान केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता आहे अशा मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी लिंक तयार करण्यात आली असून याद्वारे नागरिकांना मतदान केंद्राची लाईव्ह अपडेट मिळणार आहे, वृद्ध, दिव्यांग नागरिक, रुग्ण, स्तनदा माता यांना या यंत्रणेचा फायदा होणार आहे. गोपनीयतेचा भंग होणार यासाठी मतदान केंद्रावरील रांगेत उपस्थितांचे चेहरे दिसणार नाहीत अशीही दक्षता यामध्ये घेण्यात आली आहे.
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: कॉंग्रेस कार्यकर्त्यांनीच खरगेंच्या फोटोला शाई फासली)
मतदान केंद्रावरील गर्दी बघण्यासाठी लिंक : https://www.nashikelections.com
या मतदान केंद्रांवर असणार सुविधा –
1) बूथ क्र. 55, मराठा हायस्कूल, गंगापूर रोड, 2) बूथ क्र. 59, महर्षी शिंदे अध्यापक विद्यालय गंगापूर रोड, 3) बूथ क्र. 65, वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिर, गंगापूर रोड, 4) बूथ क्र. 69, वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिर, गंगापूर रोड, 5) बूथ क्र. 76 न्यू मराठा हायस्कूल, वाघ गुरुजी शाळा परिसर, गंगापूर रोड, 6) बूथ क्र.108 रवींद्रनाथ विद्यालय, प्राथमिक शाळा, मानेकशा नगर, द्वारका, 7) बूथ क्र.117 रवींद्रनाथ विद्यालय, प्राथमिक शाळा, मानेक्षा नगर, द्वारका, 8) बूथ क्र.126 नॅशनल उर्दू हायस्कूल, सारडा सर्कल, 9) बूथ क्र.151 K.V.N .नाईक शिक्षण प्रसारक संस्था कला, वाणिज्य आणि विज्ञान, कॉलेज, डोंगरे वसतिगृह, 10) बूथ क्र. 156, मनपा शाळा क्र.43, अटलबिहारी वाजपेयी शाळा, काठे गल्ली, 11) बूथ क्र.167 मातोश्री सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक शाळा, पखाल रोड, 12) बूथ क्र. 172 सिंधू सागर अकादमी, इंग्रजी माध्यम हायस्कूल, जुनी पंडित कॉलनी, 13) बूथ क्र. 176 रचना विद्यालय, शरणपूररोड, 14) बूथ क्र. 179 बी.वाय.के. कॉमर्स कॉलेज इमारत 1, कॉलेजरोड, 15) बूथ क्र.187 रमाबाई आंबेडकर गर्ल्स हायस्कूल, गडकरी चौक, 16) बूथ क्र.193 सेंट फ्रान्सिस हायस्कूल, गोल्फ क्लब मैदानाजवळ, 17) बूथ क्र.220 मनपा शाळा 43 अटल बिहारी वाजपेयी, प्राथमिक शाळा काठे गल्ली, 18) बूथ क्र.230 बॉईज टाऊन हायस्कूल, प्राथमिक विभाग, 19) बूथ क्र.243 बॉईज टाऊन हायस्कूल, माध्यमिक विभाग, 20) बूथ क्र. 253 जनता विद्यालय, गांधी नगर, 21) बूथ क्र. 256 रायन इंटरनॅशनल स्कूल, उजवीकडे- इमारत, डीजीपी नगर-1, 22) बूथ क्र.269 सुखदेव प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, इंदिरा नगर, नाशिक, 23) बूथ क्र. 277 स्वामी विवेकानंद शाळा, इंदिरा नगर, 24) बूथ क्र.280 स्वामी विवेकानंद शाळा, इंदिरा नगर, 25) बूथ क्र. 294 रायन इंटरनॅशनल स्कूल, उजवीकडे बिल्डिंग, डीजीपी नगर-1
हेही पहा –