आयपीएल संपल्या संपल्या टी-२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे निदान भारतीय प्रेक्षकांना तरी लगेचच टी-२० चा आणखी एक थरार पहायला मिळणार आहे. २००७ साली आयसीसीने पहिल्यांदा टी-२० विश्वचषक स्पर्धा आयोजित केली. आणि तेव्हापासूनच या प्रकाराची रंगत आणि व्यावसायिकता लोकांना कळली. आयपीएल लीगची सुरुवातही पुढील वर्षी २००८ मध्ये झाली. दर दोन वर्षांनी होणारा टी-२० विश्वचषक आता लोकांच्या मनात रुजला आहे. आणि षटकार, चौकारांची आतषबाजी बघायला लोकही आतुर आहेत. (T-20 World Cup)
टी-२० क्रिकेट म्हटलं की षटकार, चौकार आणि धावांचे विक्रम. आधीच्या ८ हंगामातही त्यांची बरसता झाली आहे. तेव्हा या लेखात पाहूया टी-२० विश्वचषकातील फलंदाजी, गोलंदाजी आणि धावांचे असेच काही विक्रम. (T-20 World Cup)
सर्वाधिक धावा
टी-२० क्रिकेटप्रमाणेच हा विक्रमही भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावावर आहे. २७ सामन्यांमध्ये त्याने ११४१ धावा केल्या आहेत त्या ८१.५० च्या सरासरीने. त्याची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आहे नाबाद ८९. आतापर्यंत त्याने १५ अर्धशतकं टी-२० विश्वचषकात केली आहेत. आणि त्याचा स्ट्राईकरेट १३१ धावांचा आहे.
दुसऱ्या क्रमांकावर आहे महेला जयवर्धने. ३१ सामन्यांत त्याने १०१६ धावा केल्या आहेत त्या ३९.०७ च्या सरासरीने. १०० ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याने १ शतक आणि ६ अर्धशतकं ठोकली आहेत. आणि त्याचा स्ट्राईकरेट १३४ धावांचा आहे.
वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल ९६५ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची सरासरी ३४.४६ ची आहे. आणि ११७ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. त्याचा स्ट्राईकरेट आहे १४२ धावांचा.
गोलंदाजीत अव्वल आहे तो बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन. ३६ सामन्यांत त्याने ४७ बळी घेतले आहेत. आणि त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे ९ धावांत ४ बळी. षटकामागे ६.७८ च्या गतीने त्याने धावा दिल्या आहेत.
त्या पाठोपाठ आणखी एक फिरकीपटू शाहीद आफ्रिदी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ३४ सामन्यांत ३९ बळी टिपले आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे ११ धावांत ४ बळी. आणि षटकामागे त्यानेही फक्त ७.७१ धावा दिल्या आहेत.
तेज गोलंदाज लसिथ मलिंगा हा पहिल्या पाचांत असलेला एकमेव तेज गोलंदाज आहे. मलिंगाने ३१ सामन्यांत ३८ बळी मिळवले आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे ३१ धावांत ५ बळींची. आणि षटकामागे त्याने ७.४३ धावा दिल्या आहेत.
भारताचा सगळ्यात यशस्वी गोलंदाज आहे तो रवीचंद्रन अश्विन. त्याने २४ सामन्यांत ३८ बळी मिळवले आहेत. तो गोलंदाजांच्या क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे.
टी-२० विश्वचषकात आतापर्यंत ११ शतकं झाली आहेत. आणि ब्रँडन मॅक्युलमला आक्रमक फलंदाजीसाठी बॅझ हे टोपणनाव या स्पर्धेतूनच मिळालं. बांगलादेश विरुद्ध त्याने केलेल्या १२३ धावा ही स्पर्धेच्या इतिहासातील एक वादळी आणि आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी आहे. त्या पाठोपाठ ख्रिल गेलच्या ११७, ॲलेक्झांडर हेल्सच्या नाबाद ११६, अहमद शेहझादच्या नाबाद १११ आणि रिली रसॉच्या १०९ धावांचा क्रमांक लागतो.
Join Our WhatsApp Community