Lok Sabha Election 2024 : मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, महाराष्ट्रात १३ जागांवर सोमवारी मतदान; कुणामध्ये होणार लढत?

महाराष्ट्रातील या १३ जागांपैकी ७ जागांवर भाजपाचे उमेदवार आहेत, तर ६ जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

172
Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, १३ जागांवर सोमवारी मतदान; कुणामध्ये होणार लढत?

लोकसभा निवडणुकीच्या ५व्या फेरीचा प्रचार शनिवारी संपला. सोमवारी, (२० मे) रोजी उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, ओडिशा, झारखंड, जम्मू काश्मीर आणि लडाख या २ केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ४९ जागांवर मतदान होणार आहे. या टप्प्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, कौशल किशोर, साध्वी निरंजन ज्योती, भानू प्रताप वर्मा आणि योगी सरकारचे मंत्री दिनेश सिंह हे मोदी सरकारमधील रायबरेलीमधून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात लढत आहेत. ५व्या टप्प्यात यूपीमध्ये १४ जागांवर मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात सोमवारी ५व्या टप्प्यात लोकसभेच्या १३ जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यात ४८ जागा आहेत आणि त्यापैकी १३ लोकसभा निवडणुकीच्या ५व्या टप्प्यात मतदान होणार आहे. धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य आणि मुंबई दक्षिण हे लोकसभा मतदारसंघ आहेत. सर्व जागांसाठी सकाळी ७ वाजता मतदान सुरू होईल. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

(हेही वाचा – Helicopter Crash : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर कोसळले )

महाराष्ट्रातील या १३ जागांपैकी ७ जागांवर भाजपाचे उमेदवार आहेत, तर ६ जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी (MVA) मध्ये काँग्रेस तीन जागांवर, NCC (शरदचंद्र पवार) २ जागांवर आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उर्वरित ९ जागांवर रिंगणात आहे. महाराष्ट्रातील या १३ जागांवर शिवसेनेच्या दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

कुणामध्ये होणार लढत?
मुंबई उत्तर 
पीयूष गोयल (भाजपा) आणि काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात लढत आहे.

मुंबई उत्तर मध्य 
उज्ज्वल निकम (भाजपा) यांचा सामना काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याशी आहे.

मुंबई दक्षिण
अरविंद सावंत (शिवसेना उबाठा) विरुद्ध यामिनी जाधव (शिवसेना) हे आमनेसामने आहेत.

मुंबई दक्षिण मध्य
राहुल शेवाळे (शिवसेना) अनिल देसाई (शिवसेना उबाठा) यांच्याशी लढत आहेत.

मुंबई उत्तर-पश्चिम
रवींद्र वायकर (शिवसेना) हे अमोल कीर्तिकर (शिवसेना उबाठा) यांच्या विरोधात लढत आहेत.

मुंबई ईशान्य
संजय दिना पाटील (शिवसेना उबाठा) हे भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत.

कल्याण 
वैशाली दरेकर-राणे (शिवसेना उबाठा) यांच्या विरोधात डॉ. श्रीकांत शिंदे (शिवसेना) लढत आहेत.

ठाणे
राजन बाबुराव विचारे (शिवसेना उबाठा) विरुद्ध नरेश म्हस्के (शिवसेना) अशी लढत आहे.

भिवंडी
कपिल मोरेश्वर पाटील (भाजपा) विरुद्ध सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी) यांच्यात निवडणूक रंगणार आहे.

पालघर 
हेमंत सावरा (भाजप) यांची भारती कामडी (शिवसेना उबाठा) यांच्याशी लढत आहे.

धुळे 
भामरे सुभाष रामराव (भाजपा) यांच्या विरोधात शोभा दिनेश (काँग्रेस) निवडणूक लढवत आहेत.

दिंडोरी 
डॉ. भारती प्रवीण पवार (भाजपा) यांच्या विरोधात भास्कर मुरलीधर भगरे (शरदचंद्र गट) निवडणूक लढवत आहेत.

नाशिक 
हेमंत तुकाराम गोडसे (शिवसेना) विरुद्ध राजाभाऊ वाजे (उद्धव गटातील शिवसेना) यांच्यात लढत होणार आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.