EPFO: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने क्लेम सेटलमेंट नियमांत केले बदल? वाचा सविस्तर

अशा प्रकरणांमध्ये फसवणूक रोखण्यासाठी मृत व्यक्तीचे सदस्यत्व आणि दावेदारांचीही चौकशी केली जाणार आहे.

197
EPFO: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने क्लेम सेटलमेंट नियमांत केले बदल? वाचा सविस्तर
EPFO: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने क्लेम सेटलमेंट नियमांत केले बदल? वाचा सविस्तर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) क्लेम सेटलमेंटच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. ज्या प्रकरणांमध्ये ईपीएफओ सदस्याचे निधन झाले आहे आणि त्यांचे आधार पीएफ खात्याशी जोडलेले नसेल किंवा माहिती जुळत नसेल, अशा प्रकरणांमध्ये संघटनेनं दिलासा दिला असून अशा परिस्थितीतही पीएफ खात्याची रक्कम मिळू शकणार आहे.

ईपीएफओनं नुकतंच यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, ईपीएफ सदस्यांचा मृत्यू झाल्यास क्षेत्रीय अधिकाऱ्यांना त्यांचे आधार तपशील जोडण्यात आणि पडताळणी करण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अशा परिस्थितीत ईपीएफ सदस्याच्या नॉमिनीला पैसे देण्यास उशीर होत होता.

(हेही वाचा – Army & Assam Rifles: लष्कर आणि आसाम रायफल्सने दहशतवाद्यांच्या हल्ल्यापासून ७५ महिलांची केली सुटका)

प्रादेशिक अधिकारी देणार मंजुरी
ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, सदस्याच्या मृत्यूनंतर आधार तपशील दुरुस्त करता येत नसल्यानं आता अशा सर्व प्रकरणांमध्ये आधार लिंक न करता प्रत्यक्ष आधारावर दावा पडताळणीला मान्यता देण्यात आली आहे. प्रादेशिक अधिकाऱ्याच्या परवानगीनंतरच हे करता येणार आहे. इतकंच नाही, तर अशा प्रकरणांमध्ये फसवणूक रोखण्यासाठी मृत व्यक्तीचे सदस्यत्व आणि दावेदारांचीही चौकशी केली जाणार आहे.

आधार डेटा चुकीचा असेल तर
ईपीएफ यूएएनमध्ये सदस्याचा तपशील योग्य असला तरी आधार डेटामध्ये चुकीचा असेल अशा प्रकरणांमध्ये हा नियम लागू होईल. त्याचबरोबर आधारमधील तपशील योग्य पण यूएएनमध्ये चुकीचा असेल तर नॉमिनीला त्यासाठी स्वतंत्रपणे प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

कायदेशीर वारसांना आधार कार्ड सादर करण्याची मुभा
आधार तपशील न देताच एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यास नॉमिनीचा आधार तपशील सिस्टममध्ये सेव्ह होईल आणि त्याला स्वाक्षरी करण्याची परवानगी दिली जाईल. मृत सदस्यानं नॉमिनी न केल्यास कुटुंबातील एक सदस्य आणि कायदेशीर वारसांना आधार कार्ड सादर करण्याची मुभा असेल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.