- ऋजुता लुकतुके
आयपीएलच्या सतराव्या हंगामातील साखळी सामने आता संपले आहेत. रविवारच्या दिवशी पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैद्राबादने (SRH) पंजाब किंग्जचा ४ गडी राखून पराभव केला. तर दुसरा कोलकाता आणि राजस्थान दरम्यानचा सामना पावसात वाहून गेला. त्यामुळे गुण तालिकेत कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघ १४ पैकी ९ सामन्यांत विजय आणि एक सामना अनिर्णित राखून २० गुणांसह अव्वल क्रमांकावर पोहोचले. तर सनरायझर्स हैद्राबाद (SRH) संघ १४ पैकी ८ सामने जिंकून १७ गुणांसह सरस धावगतीच्या आधारे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. राजस्थानला रद्द झालेल्या सामन्याचा एक गुण मिळून त्यांचे १७ गुण झाले. त्यांचा आता तिसरा क्रमांक आहे. तर बंगळुरू (RCB) संघाने शेवटच्या साखळी सामन्यांत चेन्नईचा पराभव करून १४ पैकी ७ सामने जिंकत १४ गुण मिळवले. चेन्नईला धावगतीच्या आधारे मागे टाकत त्यांनी बाद फेरी गाठली आहे. (IPL Playoffs)
(हेही वाचा- EPFO: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने क्लेम सेटलमेंट नियमांत केले बदल? वाचा सविस्तर)
बाद फेरीत आता मंगळवारी पहिली क्वालिफायर (IPL Playoffs) लढत होईल ती कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैद्राबाद (SRH) या पहिल्या दोन संघांदरम्यान. त्यानंतर बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या संघांदरम्यान एलिमिनेटरची लढत होईल. (IPL Playoffs)
No game in Guwahati. It’s set. #IPL2024 pic.twitter.com/jJgmhKt0ss
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 19, 2024
एलिमिनेटरच्या लढतीतील पराभूत संघ स्पर्धेतून बाद होईल. तर पहिल्या क्वालिफायर लढतीतील विजेता संघ थेट अंतिम फेरीत जाईल. आणि पराभूत संघाला एलिमिनेटर लढतीतील विजेत्याशी दुसरा क्वालिफायर सामना खेळण्याची संधी मिळेल. ही लढत जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहोचेल. पहिली क्वालिफायर लढत कोलकाता आणि हैद्राबाद संघांदरम्यान २१ मे ला अहमदाबाद इथं होणार आहे. तर एलिमिनेटर सामना दोन रॉयल संघांदरम्यान २२ मे ला त्याच मैदानावर पार पडेल. क्वालिफायरची दुसरी लढत आणि अंतिम फेरी २४ आणि २६ मे ला चेन्नईला होणार आहे. (IPL Playoffs)
For his delightful opening act, Abhishek Sharma bags the Player of the Match award 🏆
Scorecard ▶️ https://t.co/K5rcY5Z8FS#TATAIPL | #SRHvPBKS pic.twitter.com/7zS41SSGLw
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2024
रविवारचा पहिला साखळी सामना मोठ्या धावसंख्येचा ठरला. पंजाबने पहिली फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ बाद २१४ धावा केल्या त्या प्रभसिमरन सिंगच्या ७१ आणि रिली रसॉच्या ४९ धावांच्या जोरावर. सलामीवीर अथर्व तावडेनंही ४६ धावांचं योगदान दिलं. सनरायझर्स हैद्राबाद (SRH) संघाची सुरुवात खरंतर खराब झाली होती. फॉर्मात असलेला ट्रेव्हिस हेड शून्यावर बाद झाला. पण, त्यानंतर अभिषेक शर्माने २८ चेंडूंत ६८ धावा करत हैद्राबादचं आव्हान कायम ठेवलं. त्यानंतर राहुल त्रिपाठी, नितिश राणा आणि हेनरिक क्लासेन यांच्या छोट्या योगदानांनी मिळून हैद्राबादने ही धावसंख्या ५ चेंडू राखून पूर्ण केली. (IPL Playoffs)
हेही पहा-