NSE, BSE Shut Today : मतदानासाठी राष्ट्रीय तसंच मुंबई शेअर बाजार सोमवारी बंद

NSE, BSE Shut Today : २० मे ला ८ राज्यांत ४९ जागांसाठी मतदान होत आहे

138
NSE, BSE Shut Today : मतदानासाठी राष्ट्रीय तसंच मुंबई शेअर बाजार सोमवारी बंद
NSE, BSE Shut Today : मतदानासाठी राष्ट्रीय तसंच मुंबई शेअर बाजार सोमवारी बंद
  • ऋजुता लुकतुके

सोमवारी २० मे ला राष्ट्रीय शेअर बाजार (एनएससी) आणि मुंबई शेअर बाजार (बीएससी) (NSE, BSE Shut Today) हे दोन्ही बाजार मतदानामुळे बंद असणार आहेत. शेअरची खरेदी-विक्री, डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग तसंच एसएबी हे सर्व व्यवहार या दिवशी बंद असतील. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच कमोडिटी बाजार संध्याकाळी पाच ते रात्री साडेअकरा या वेळात सुरू राहील. सकाळी ९ ते ५.३० या वेळेत हे एक्सचेंजही बंदच असेल.  (NSE, BSE Shut Today)

(हेही वाचा- EPFO: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने क्लेम सेटलमेंट नियमांत केले बदल? वाचा सविस्तर)

२० मे ला ८ राज्यांत ४९ जागांसाठी मतदान होत आहे. त्यामुळे त्या मतदार संघातील बँका, वित्तीय संस्था आणि सरकारी कार्यालयंही बंद असणार आहेत. त्यामुळे शेअर बाजारालाही सुटी देण्यात आली आहे. मंगळवारी २१ तारखेला सव्वानऊ वाजता नियमितपणे शेअर बाजार सुरू होईल. तर ९ वाजता एनएससी आणि बीएससीवर प्री-ओपनिंग सत्रही नेहमीसारखंच सुरू होईल. (NSE, BSE Shut Today)

देशात यंदा ७ टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. १९ एप्रिलला सुरू झालेलं मतदान २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २७ मे आणि १ जून अशा टप्प्यांमध्ये होणार आहे. त्यानंतर ४ जूनला मतमोजणी होऊन निकाल घोषित होतील. पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाम, ओडिशा आणि झारखंड ही राज्या तर जम्मू व काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होणार आहे. (NSE, BSE Shut Today)

(हेही वाचा- IPL Playoffs : कोलकाता आणि हैद्राबाद दरम्यान क्वालिफायर, तर एलिमिनेटरसाठी रॉयल लढत )

मतदानासाठीच्या सुटीनंतर १७ जूनला बकरी – ईद, १७ जुलै मुहर्रम, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, २ ऑक्टोबर गांधी जयंती, १ नोव्हेंबर दिवाळी, १५ नोव्हेंबर गुरु नानक जयंती, २५ डिसेंबर ख्रिस्ममस अशा सुट्या शेअर बाजारासाठी जाहीर झाल्या आहेत. (NSE, BSE Shut Today)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.