Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रांपासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी

166
Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रांपासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी
Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रांपासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) मतदान केंद्रापासून (Polling stations) 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतदानाची सर्व प्रक्रिया गोपनीय आहे. मतदान केंद्रावरील गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. मतदारांच्या गोपनीयतेसाठी मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतदारांनीही मतदानासाठी येताना मोबाईल आणू नयेत, असेही आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेने केले आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- EPFO: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने क्लेम सेटलमेंट नियमांत केले बदल? वाचा सविस्तर)

मतदानासाठी मतदान ओळखपत्राशिवाय 12 पुरावे ग्राह्य

मतदारांनी मतदानासाठी जाताना भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) त्यांना दिलेले निवडणूक ओळखपत्र सोबत घेऊन जायचे आहे. ओळखपत्र मिळाले नसेल तर इतर 12 ओळखपत्र ही पुरावा म्हणून ग्राह्य धरणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. यामध्ये, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, शासन, सार्वजनिक उपक्रम तसेच पब्लिक लिमिटेड कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना वितरित छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, बॅंक किंवा टपाल विभागाचे छायाचित्र असलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही स्मार्ट कार्ड, मनरेगा रोजगार ओळखपत्र, कामगार आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, निवृत्तीवेतन दस्तऐवज, दिव्यांग व्यक्ती ओळखपत्र आणि आधारकार्ड यांचा समावेश आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.