Lok Sabha Election Voting : वीर सावरकरांच्या वंशजांनी बजावला मतदानाचा हक्क

मतदारांनी आजचा दिवस सुटीचा म्हणून साजरा न करता लोकशाहीतील कर्तव्य म्हणून मतदारांनी प्रथम मतदान करावे, असे आवाहन रणजित सावरकर यांनी केले.

198
Lok Sabha Election Voting : वीर सावरकरांच्या वंशजांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणूक 2024च्या महाराष्ट्रातील अंतिम आणि पाचव्या टप्प्यात सोमवार, 20 मे रोजी मुंबई, ठाणेसह 13 मतदारसंघात मतदान (Lok sabha election voting) पार पडत आहे. अशा वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वंशज यांनीही मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या या उत्सवात सहभाग घेतला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी मुंबईतील दादर येथील मतदान केंद्रात सकाळी 8.30 वाजता मतदानाचा हक्क बजावला, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नात असिलता राजे यांनीदेखील ठाणे येथे मतदानाचा हक्क बजावला. अधिकाधिक संख्येने मतदारांनी घराबाहेर पडून मोठ्या संख्येने मतदान करणे गरजेचे आहे. त्यामुळे मतदारांनी आजचा दिवस सुटीचा म्हणून साजरा न करता लोकशाहीतील कर्तव्य म्हणून मतदारांनी प्रथम मतदान करावे, असे आवाहन रणजित सावरकर यांनी केले. (Lok sabha election voting)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रांपासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.