राज्यात सोमवारी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. ठिकठिकाणी ईव्हीएम मशीनला खोळंबा होत असल्याचं समोर येत आहे. डोंबिवलीतदेखील असाच प्रकार घडला आहे. मतदानाच्या वेळी ईव्हीएम बंद पडले म्हणून एक काका चांगलेच संतापले. त्यांनी त्यांचा राग व्यक्त केला आहे. (Lok Sabha Election 2024)
ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील एक डोंबिवलीकर काका संतापले. मशीन सकाळपासून अजूनपर्यंत सुरू नाही. सकाळी साडेसहा वाजल्यापासून लोकं रांगेत उभी आहेत. सारखं बाहेर काढा, बाहेर काढा चाललं आहे. इथे आणखी किती वेळ लोकं उभी राहणार? असा सवाल या संतप्त काकांनी विचारला (Thane Lok Sabha) आहे. लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. १३३ नंबर खोली क्रमांक २ मंजुनाथ शाळा येथील मशीन सकाळपासून बंद असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : ओडिशातील निवडणूक रोमांचक वळणावर, बीजेडीपुढे अस्तित्त्वाचे संकट )
मतदारांनी व्यक्त केला संताप
संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं असता संपूर्ण भागात फक्त २ इंजिनियर असल्याचं सांगत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया या काकांनी दिली आहे. सोमवारी राज्यात लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदान (Thane Lok Sabha Election 2024) पार पडत आहे. डोंबिवलीत सकाळपासून १ ईव्हीएम मशीन बंद आहे. त्यामुळे नागरिकांनी राग व्यक्त केला आहे. ईव्हीएम मशीन बंद असल्याचा परिणाम मतदानावर होत ( EVM Machine)आहे.
अनेक ठिकाणी मशीन दुरुस्तीचे काम सुरू
मतदारांमधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू होताच ईव्हीएम मशिनचा खोळंबा झाला आहे. मतदान केंद्राबाहेर ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे नागरिकांच्या लांब रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी मशीन दुरूस्तीचे काम सुरू आहे. पूर्वेकडील मंजुनाथ (Thane News) शाळेमधील मतदान केंद्रातील एक ईव्हीएम बंद पडल्यामुळे मतदार वैतागले आहेत. ठाण्यातील नौपाडा तर नाशिकमधील आडगाव मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याचंदेखील समोर आलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community