लोकसभा २०२४ च्या (Lok Sabha Election 2024) निवडणूकीची जय्यत तयारी चालू असून, राज्यात अंतिम पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. देशात इतर ठिकाणी सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील मतदान बाकी असून यासाठी नेतेमंडळी प्रचार सभा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सोमवारी ओडिशातील पुरी (Odisha Puri) येथे मोठा दावा केला. पुरी येथे त्यांनी भाजपा उमेदवार संवित पात्रा यांच्या समर्थनार्थ रोड शो केला. येथे रोड शो केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ढेंकनालमध्ये रॅली काढली. रॅलीला संबोधित करताना त्यांनी राज्यातील सत्ताधारी पक्ष बिजू जनता दलावर (BJD) जोरदार निशाणा साधला. (PM Narendra Modi)
(हेही वाचा – Lok Sabha Election Voting : अधिकारी वर्गाने बजावला मतदानाचा अधिकार)
मोदी म्हणाले की, बीजेडी सरकार पूर्णपणे भ्रष्टाचाऱ्यांच्या ताब्यात आहे. भ्रष्ट मुख्यमंत्र्यांनी निवासस्थान आणि कार्यालयावर कब्जा केल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. तसेच, बीजेडीवर ओडिशाची संपत्ती आणि संस्कृती नष्ट केल्याचा आरोप केला आहे. बीजेडी सरकारमध्ये जगन्नाथ मंदिरही सुरक्षित नाही, असे पंतप्रधान म्हणाले. तसेच भाजपच्या डबल इंजिन सरकारचा (Double Engine Govt) शपथविधी सोहळा १० जून रोजी होणार असल्याचा दावा त्यांनी केला. (PM Narendra Modi)
(हेही पाहा – Lok Sabha Election Voting : राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क)
रॅलीला संबोधित करताना मोदी म्हणाले, “बीजेडी सरकारच्या काळात जगन्नाथजी मंदिरही सुरक्षित नाही. श्री रत्न भंडारची किल्लीही गेल्या सहा वर्षांपासून माहीत नाही. यामागचे मोठे रहस्य बीजेडी सरकार आणि त्यांच्या लोकांच्या जवळ आहे. मुख्यमंत्र्यांनी ते लपवून ठेवले आहे. बीजेडीने दडपलेल्या तपासाच्या अहवालात काय आहे हे जाणून घ्यायचे आहे. असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. (PM Narendra Modi)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community