- ऋजुता लुकतुके
आयपीएलच्या (IPL) या हंगामात एक फिनिक्स संघ दिसून आला. फिनिक्स पक्षी जसा राखेतून वर येतो तसा हा संघ स्पर्धेचा अर्ध्याहून अधिक काळ तळाला असताना अचानक उसळी मारून वर आला. पहिल्या ८ पैकी ७ सामने गमावलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने शेवटचे ६ सामने झोकात जिंकून बाद फेरीत प्रवेश केला आहे. संघाचा स्टार फलंदाज आणि ऑरेंज कॅप डोक्यावर असलेला विराट कोहली यावर म्हणतो, ‘देवाची योजना वेगळीच होती.’ (IPL 2024 RCB in Playoff)
मागच्या शनिवारी बंगळुरूने गतविजेत्या चेन्नईचा २४ धावांनी पराभव केला. खरंतर बंगळुरू, चेन्नई, लखनौ आणि दिल्ली या चारही संघांचे प्रत्येकी १४ गुण झाले होते. पण, बंगळुरूने सरस धावगती राखून चौथं स्थान पटकावलं आणि बाद फेरीही गाठली. आयपीएलमध्ये (IPL) इतकी खराब सुरुवात झालेली असताना बाद फेरी गाठणारा हा पहिलाच संघ ठरला आहे. आता एलिमिनेटरमध्ये बुधवारी २२ तारखेला बंगळुरूचा मुकाबला राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. (IPL 2024 RCB in Playoff)
चेन्नई विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये जात असताना विराटच्या तोंडून काही शब्द अचानक बाहेर पडले. आणि तोच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘देवाची काहीतरी योजना आहे,’ असं विराट म्हणताना दिसतो. (IPL 2024 RCB in Playoff)
.@imVkohli opens up after RCB’s dream entry into playoffs! 😇#ViratKohli • #IPL2024 • #ViratGang pic.twitter.com/9rVChPJifi
— ViratGang.in (@ViratGangIN) May 19, 2024
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: मुंबईसह राज्यात संथगतीने मतदान होत असल्याच्या तक्रारी, फडणवीसांनी घेतली गंभीर दखल)
‘तुम्ही जी गोष्ट करताय ती प्रमाणिकपणे करणं आवश्यक आहे. आमचा संघ तेच करत होता. प्रामाणिकपणे मेहनत करत होता. त्याचंच फळ आम्हाला मिळालं आहे. आता याहून अधिक काही बोलण्याची गरज नाही. पुढील आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी आता सिद्ध व्हायचं आहे,’ असं विराट पुढे म्हणतो. (IPL 2024 RCB in Playoff)
विराट कोहली २००७ पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रँचाईजीबरोबर जोडला गेला आहे. पण, आतापर्यंत एकदाही संघाने आयपीएल विजेतेपद पटकावलेलं नाही. यंदा महिला आयपीएलमध्ये (IPL) बंगळुरू फ्रँचाईजीचा संघ विजयी झाला आहे. विराट कोहली बॅटने मात्र जबरदस्त फॉर्मात असून आतापर्यंत १४ सामन्यांत त्याने ७०८ धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपही त्याच्याच नावावर आहे. (IPL 2024 RCB in Playoff)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community