देशभरात १८ व्या लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असून, राज्यात अंतिम पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. पाचव्या टप्प्यात एकूण १३ लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून, त्यापैकी मुंबई शहर आणि उपनगरात एकूण ०६ लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात मुंबईकर मोठ्या संख्येने सामील झाला आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी मतदान केंद्रावर (Mumbai Polling Station Closed) लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या (Election Commission) नियमानुसार त्यांना टोकन देण्यात येणार असून, त्यांना मतदान करता येणार आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – उबाठा गटावर Muslim नाराज; निवडणुकीत फटका बसणार?)
लोकसभा आयोगाच्या नियमानुसार सकाळी ०७ ते संध्याकाळी ०६ पर्यंत मतदान करण्याची करण्याची परवानगी आहे. दरम्यान पवई हिरानंदानी (Powai Hiranandani) भागात अजूनही राडा सुरूच आहे. पवई हिरानंदानी भागात दोन तासांपासून मतदान खोळंबलं होतं. बंद पडलेलं मतदान यंत्र बदलूनही मतदान खोळंबलेलंच आहे. वरळीसह काही ठिकाणी मतदान केंद्रावर कारभार संथगतीने चालू असल्यामुळे मतदारांमध्ये नाराजी दिसून येत आहे. अशातच निवडणूक आयोगाच्या नियमानुसार संध्याकाळी ०६ पर्यंत मतदान केंद्रावर मतदान करण्याची परवानगी आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी मतदान केंद्रावर (Mumbai Polling Station) झालेल्या विलंबामुळे नागरिकांचे अजूनही मतदान झालेले नाही. दरम्यान संध्याकाळच्या ०६ वाजेपर्यंत मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांना मतदान केंद्रामार्फत (Polling Station) टोकन क्रमांक (Token Number) देण्यात आले आहे. टोकन दिलेल्या मतदारांना रात्री कितीही उशिर झाले तरी मतदान करता येणार आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community