निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे मतदानाचा टक्का घसरला; Aditya Thackeray यांचा आरोप

158
लोकशाही, संविधानाला असलेला धोका संपला नाही; Aditya Thackeray यांचा भाजपावर निशाणा

निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे मुंबईसह अन्य ठिकाणी मतदान कमी झाल्याचा आरोप उबाठा शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. (Aditya Thackeray)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे त्यांच्या मतदारसंघात मतदान केंद्राच्या प्रत्येक बूथवर जावून पाहणी करत आहेत. या पाहणीत त्यांना काही त्रुटी आढळल्या आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाकडून योग्य नियोजन न झाल्यामुळे मतदानाचा टक्का कमी झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. (Aditya Thackeray)

(हेही वाचा – निवडणूक आयोगाकडून मतदारांची अडवणूक हा मोदी सरकारचा डाव; Uddhav Thackeray यांचा आरोप)

पोलिंग बूथवर सुविधा नसल्यामुळे मतदानाचा टक्का कमी झाला, असा दावा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे. यावेळी त्यांनी स्वतःचा व्हिडिओ समाज माध्यमावर पोस्ट केला. “हा व्हिडीओ निवडणूक आयोगासाठी आहे. मुंबईत आज मतदान आहे आणि सगळे मुंबईकर सकाळपासून मतदान करण्यासाठी बाहेर पडले आहेत. पण प्रश्न हा आहे की मुंबईतील पोलिंग बूथवर सोयीसुविधा फार कमी आहेत. सगळे उन्हात उभे आहेत. पंखेसुद्धा लावण्यात आले नाहीत. एक दोघांना चक्कर सुद्धा आली. पाण्याची सोय नाही. सावलीत कुठे रांगा उभ्या केल्या नाहीत”, असे आदित्य ठाकरे या व्हिडिओ मध्ये म्हणत आहेत. (Aditya Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.