आठ वेळा बोगस Voting झालेल्या मतदान केंद्रावर पुन्हा होणार मतदान

422

देशात सोमवार, २० मे रोजी ५व्या टप्प्यासाठी मतदान झाले. त्यावेळी मात्र एक धक्कादायक प्रकार समोर आला उत्तर प्रदेशातील फरुखाबाद लोकसभा मतदारसंघातील एटा येथील अलिगंज विधानसभा मतदारसंघात एका युवकाने तब्बल ८ वेळा बोगस मतदान केल्याचा प्रकार सामोरे आला. त्या युवकाने आठही वेळा मतदान (Voting) करताना व्हिडीओ काढले, त्यामुळे एकच खळबळ उडाली. आता निवडणूक आयोगाने या मतदान केंद्रावर २५ मे रोजी पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : मुंबईसह १३ मतदार संघांत पाच वाजेपर्यंत अंदाजे ४८.६६ टक्के मतदान)

त्या मतदानकेंद्रावर ६९.२२ टक्के मतदान 

घडल्या प्रकारामुळे निवडणूक आयोगाने कारवाई करत अधिकाऱ्यांना निलंबित केले असून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या किशोर नावाच्या त्या युवकालाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तपासात अनेक खुलासे झाले आहेत. या बूथवर ६९.२२ टक्के मतदान झाल्याचे तपासात समोर आले आहे. यामध्ये फक्त दहा जणांनी मतदार ओळखपत्राचा वापर केला आहे. किशोरने स्वत: व्हिडीओ बनवून पोस्ट केला नसता तर हा प्रकार समोर आला नसता. भाजपसह विरोधी पक्ष प्रशासनावर आरोप करत आहे. सध्या आयोगाने येथे फेरमतदानाची तारीखही जाहीर केली आहे. येथे २५ मे रोजी पुन्हा मतदान होणार आहे. फर्रुखाबाद लोकसभा जागेसाठी चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान (Voting) झाले. एका आठवड्यानंतर, रविवारी, येथील अलीगंज विधानसभा मतदारसंघातील खिरिया पावरण यांच्या बूथचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये एक किशोर एक-एक करून बूथच्या आत जाऊन भाजप उमेदवाराला मत देत आहे. यासोबतच तो मोबाईलवरून व्हिडिओही बनवत आहे. तो ज्या पद्धतीने मतांची मोजणी करत आहे, त्यावरून जणू त्याला कोणीतरी बनावट मतदानाचे (Voting) काम दिले असल्याचे बोलले जात आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.