Khed: जगबुडी नदीत पाचजण बुडाले, तिघांना वाचवण्यात यश     

खेड तालुक्यातील तुंबाड येथे जगबुडी नदीत पाच जण बुडाल्याची घटना घडली आहे. तुंबाड येथे पोहायला गेलेल्या पाच जणांपैकी दोघांचा यात बुडून मृत्यू झालाय. यातील तिघांना वाचविण्यात यश आलंय.

180
Khed: जगबुडी नदीत पाचजण बुडाले, तिघांना वाचवण्यात यश     

रत्नागिरी जिल्ह्यामधील (Ratangiri District) खेड तालुक्यातील तुंबाड (tumbad) येथे जगबुडी नदीत पोहायला गेलेल्या तरूणांन संदर्भात एक दुखद बातमी समोर आली आहे. सोमवारी २० मे रोजी तुंबाड येथे जगबुडी नदीपात्रात (Jagbudi River) पाच जण बुडल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये पाचजणांपैकी तिघांना वाचवण्यात यश आले आहे. तर उर्वरित दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सौरभ हरिश्चंद्र नाचरे (Saurabh Harishchandra Nachre) (१९, रा. पन्हाळजे, ता. खेड) व अंकेश संतोष भागणे (Ankesh Santosh Bhagne) (२०, रा. मधली वाडी, बहिरवली, ता. खेड) अशी या मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.  (Khed)

(हेही वाचा – पराभव दिसत असल्याने उद्धव ठाकरेंचे रडगाणे सुरू; Devendra Fadnavis यांची बोचरी टीका )

मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ आणि अंकेश यांच्यासह अभय पांडुरंग भागणे, महेश मारुती गमरे, मयंक प्रकाश बाणाईत असे पाच जण तुंबाड येथील जगबुडी नदीपात्रात पोहायला गेले होते. नेमकी ती वेळ भरतीची असल्याने या पाचही जणांना पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाचही जण गटांगळ्या खाऊ लागले.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : मुंबईसह १३ मतदार संघांत पाच वाजेपर्यंत अंदाजे ४८.६६ टक्के मतदान)

याच दरम्यान नदीपात्रात मासेमारी करणाऱ्या नावाड्याने ही घटना बघितली आणि त्यातील तिघांना वाचवले. मात्र सौरभ आणि अंकेश हे भरतीच्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने ते बोटीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे ते मृत्युमुखी पडले. स्थानिक ग्रामस्थांनी नंतर त्या दोघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. 

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत खेड पोलीस ठाण्यात (Khed Police Station) गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे या दोघांची अधिक माहिती मिळू शकली नाही. या दुर्दैवी घटनेमुळे पन्हाळजे – बहिरवली पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. (Khed) 

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.