Mahadev Betting App प्रकरणातील तीन मुख्य आरोपींना मध्य प्रदेशातून अटक!

173
Mahadev Betting App प्रकरणातील तीन मुख्य आरोपींना मध्य प्रदेशातून अटक!
Mahadev Betting App प्रकरणातील तीन मुख्य आरोपींना मध्य प्रदेशातून अटक!

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व नारायणगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई (Mahadev Betting App) केली आहे. मध्यप्रदेशातील शाहगड (जिल्हा सागर) येथून नारायणगावातील अनधिकृतपणे चालणाऱ्या महादेव बेटिंग अॅप (Mahadev Betting App) प्रकरणातील तीन मुख्य फरार आरोपींना ताब्यात घेतले आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली. (Mahadev Betting App)

(हेही वाचा –HSC Result: विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! बारावीचा निकाल जाहीर होणार)

राज ललित बोकारिया (२९, शांती नगर, जुन्नर), ऋत्विक सुरेश कोठारी (२४, वारूळवाडी), मोहमद सलमान पठाण (३२, नारायणगाव) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आत्तापर्यंत एकूण 93 आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी 5 आरोपींना पुढील तपास कामी पोलीस कोठडी देण्यात आली होती. यामधील मुख्य तीन आरोपी फरार होते. त्यांना पकडण्यात यश आले आहे. (Mahadev Betting App)

(हेही वाचा –Pune Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवाल अखेर पोलिसांच्या ताब्यात!)

दरम्यान, महादेव बेटिंग अॅप प्रकरण (Mahadev Betting App) सध्या देशभर चर्चेत आहे. या प्रकरणात अनेक बड्या कलाकारांचाही सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. यापूर्वी ईडी आणि पोलिसांनी छत्तीसगड राज्य, नोएडासह अन्य काही राज्यांतील प्रमुख शहरांमध्ये महादेव बेटिंग अॅपच्या कॉल सेंटरवर कारवाई केली आहे. पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Mahadev Betting App)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.