Lok Sabha Election 2024: आएगा तो मोदी…! भाजपाला किती जागा मिळणार? राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर म्हणतात…

पूर्व आणि दक्षिणेत भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढणार असून त्यांच्या जागाही वाढताना दिसत आहेत.

430
Bihar : प्रशांत किशोर जन सूराज पार्टीची स्थापना करणार

लोकसभेचं ५व्या टप्प्यातलं मतदान सोमवारी पार पडलं. देशात पुन्हा सत्तेत कोण येणार याविषयी मतदारांमध्ये उत्सुकता वाढली असतानाच राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एक भविष्यवाणी केली आहे. (Lok Sabha Election 2024)

प्रशांत किशोर म्हणाले की, देशात एनडीए (NDA) सरकार पुन्हा सत्तेत येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ जून २०१९च्या निकालाप्रमाणे किंवा त्याहून अधिक जागांनी पुन्हा सत्तेत येतील. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना ४ जूनच्या निकालाचं चित्र काय असेल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना प्रशांत किशोर यांनी असा अंदाज वर्तवला. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा –IPL 2024 Swapnil Singh : आयपीएलच नाही, तर क्रिकेट सोडणार होता स्वप्निल सिंग, आता ठरलाय बंगळुरूसाठी हीरो )

पूर्व आणि दक्षिणेत भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढणार असून त्यांच्या जागाही वाढताना दिसत आहेत. जागांसोबत मतदानाची टक्केवारी वाढल्यानं भाजपाला दक्षिण पूर्व भागात १५-२०जगांचा फायदा होऊ शकतो. पश्चिम उत्तरमध्येही भाजपाला फारसं काही नुकसान होताना दिसत नाही. भलेही लोकांमध्ये भाजपा सरकारविरोधात नाराजी असेल, परंतु व्यापकरित्या मोदी सरकारला हटवण्याबाबत लोकांमध्ये राग दिसत नाही; कारण भाजपाला आव्हान देण्यात विरोधक कमी पडलेत, असं मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, ‘जर तुम्ही २०१४ आणि २०१९’चे निकाल पाहिले तर राजकीय विश्लेषकांनी भाजपा २७२पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही, तसेच यंदा भाजपाच्या बाजूने भविष्यवाणी केली होती. भाजपानं जागांचं लक्ष २७२ हटवून ३७२ इतकं केलं आहे. भाजपाच्या या रणनीतीमुळे बहुतांश रणनीतीकार भाजपाच्या विजयाची भविष्यवाणी करत आहेत. ३७० ते ४०० जागा पार करण्याच्या भाजपाच्या घोषणेमुळे विरोधी पक्ष अडकला आहे. जोपर्यंत इंडि आघाडी सक्रीय झाली, तोवर खूप उशीर झाला होता. भाजपाने पहिलेच त्यांचं नुकसान करणाऱ्या जागांवर फोकस केला होता, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं.

इंडि आघाडीच्या स्थापनेनंतर विरोधकांनी अनेक महिने काहीही अॅक्शन घेतली नाही. पंतप्रधानपदाचा कुठलाच चेहरा दिला नाही. भाजपाविरोधात विश्वासू आणि सक्षम चेहरा इंडि आघाडीकडे नाही, असं जनतेला वाटतं; आपल्याकडे मजबूत विरोधी पक्ष आहे, ही चांगली गोष्ट झाली. सरकार कुणाचेही असो, पक्षाला मजबूत विरोधी पक्षाचा सामना करावा लागेल, असं मुलाखतीला उत्तर देताना प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.