-
ऋजुता लुकतुके
आयपीएलच्या मागोमाग टी-२० विश्वचषक स्पर्धा असल्यामुळे अजूनही या दोन स्पर्धांची तुलना होणं स्वाभाविक आहे. आयपीएलचे साखळी सामने संपले आहेत. आणि पहिले चार संघही ठरले आहेत. अशावेळी बाद फेरी खेळणारे किती खेळाडू भारताच्या टी-२० विश्वचषक संघात आहेत याविषयी उत्सुकता वाटणं स्वाभाविक आहे. पहिल्या दोन संघांत म्हणजे कोलकाता आणि सनरायझर्स हैद्राबाद संघात भारतीय विश्वचषक संघातील एकही खेळाडू नाही. पण, उर्वरित दोन संघांत मात्र ५ खेळाडू आहेत. (T20 World Cup Indian Team)
कोलकाता संघ गुणतालिकेत आघाडीवर आहे. पण, त्यांच्याकडे रिंकू सिंग हा भारतीय संघात राखीव असलेला एकमेव खेळाडू आहे. भारताच्या टी-२० विश्वचषक संघातील खेळाडू पाहूया,
(हेही वाचा – Rameshwaram Cafe Blast प्रकरणात मोठी अपडेट! एनआयएची देशभरात ११ ठिकाणी छापेमारी)
कोलकाता नाईट रायडर्स – एकही नाही
सनरायझर्स हैद्राबाद – एकही नाही
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन व यजुवेंद्र चहल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली व मोहम्मद सिराज
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह व सूर्यकुमार यादव
दिल्ली कॅपिटल्स – रिषभ पंत, कुलदीप यादव व अक्षर पटेल
चेन्नई सुपर किंग्ज – शिवम दुबे व रवींद्र जाडेजा
लखनौ सुपर जायंट्स – एकही नाही
गुजरात टायटन्स – एकही नाही
पंजाब किंग्ज – अर्शदीप सिंग
भारतीय टी-२० विश्वचषक संघातील राखीव खेळाडू – शुभमन गिल (गुजरात टायटन्स), रिंकू सिंग (कोतकाता नाईट रायडर्स), खलील अहमद (दिल्ली कॅपिटल्स) व आवेश खान (राजस्थान रॉयल्स)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community