Emirates Flight Accident: घाटकोपरमध्ये विमानाची धडक बसल्याने ३६ फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू

सोमवारी रात्री उशिरा शोध सुरू असताना २९ फ्लेमिंगोंचे मृतदेह सापडले.

201
Emirates Flight Accident: घाटकोपरमध्ये विमानाची धडक बसल्याने ३६ फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू

घाटकोपरमधील लक्ष्मीनगर परिसरात एमिरेट्स कंपनीच्या विमानाची फ्लेमिंगोच्या थव्याला धडक बसली. या दुर्घटनेमुळे तब्बल ३६ पक्ष्यांना आपले प्राण गमवावे लागले तसेच विमानाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे विमानाचे तात्काळ लँडिंग करण्यात आले. यामध्ये विमानातील सर्व प्रवासी आणि केबिन क्रू सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. (Emirates Flight Accident)

मुंबई विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी, रात्री ९.१५ वाजता एमिरेट्सच्या ईके ५०८ या विमानाने पक्ष्यांच्या थव्याला धडक दिली. त्यानंतर मुंबई विमानतळावर विमानाचे सुरक्षितरित्या लँडिंग करण्यात आले.

(हेही वाचा – Hunt For New Coach : मुख्य प्रशिक्षक पदासाठी आता बीसीसीआयच्या रडारवर स्टिफन फ्लेमिंग)

सोमवारी रात्री उशिरा शोध सुरू असताना सुमारे २९ फ्लेमिंगोंचे मृतदेह सापडले, तर मंगळवारी सकाळी आणखी ४ ते ५ फ्लेमिंगोंचे मृतदेह सापडले आहेत. विमान कंपनीने या घटनेबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.