पुणे शहरातील अनेक रुग्णालयांत सध्या लसीकरण सुरू आहे. मात्र अनाथ आश्रम, एचआयव्ही बाधित यांसह मानसिक दृष्ट्या किंवा इतर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नयेत, यासाठी पुणे महापालिकेमार्फत ‘वॅक्सिन ऑन व्हिल्स’ हा उपक्रम राबवला जात असून, त्या अंतर्गत ५ ‘मोबाईल व्हॅन’चे लोकार्पण महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमांतर्गत घरी जाऊन थेट लसीकरण करण्यात येणार आहे. शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालयांकरिता ५ मोबाईल व्हॅन पहिल्या टप्प्यात सेवेसाठी असणार आहेत.
महापौरांच्या हस्ते लोकार्पण
पुणे महापालिकेमार्फत राबवण्यात येणार्या ‘वॅक्सिन ऑन व्हिल्स मोबाईल व्हॅन’ उपक्रमाचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन झाले. त्यावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर सभागृह नेते गणेश बिडकर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य प्रमुख आशिष भारती उपस्थित होते. वॅक्सिन ऑन व्हिल्स मोबाईल व्हॅन उपक्रमाला सीएसआर अंतर्गत जिव्हीका हेल्थकेअर प्रा. लि आणि माय वॅक्सिन या दोन्ही संस्थांचे विशेष सहकार्य लाभले असून, त्यांच्यामार्फत हा उपक्रम राबवला जाणार आहे.
(हेही वाचाः लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकली का? भाजपचा सवाल)
पुणे शहर 100 टक्के लसीकरण पूर्ण करेल
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ‘केंद्र सरकाराच्या आदेशानुसार पुणे शहरात महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू आहे. आजपर्यंत प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. लसीकरण मोहिमेला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल पुणेकरांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या शहराला अधिकाधिक लस कशा मिळतील, यासाठी सतत पाठपुरावा करत आहोत. त्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल आणि आपल पुणे शहर 100 टक्के लसीकरणा पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
व्याधीग्रस्त आणि वृद्धांसाठी लसीकरण मोहीम
आजपर्यंत आपण लसीकरण केंद्रांवर येणार्या प्रत्येकाला लस देत होतोच, पण त्यामध्ये अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, दिव्यांग, एचआयव्ही बाधित बालक, यासह मानसिक आजारग्रस्त व्यक्ती जे घराबाहेर किंवा संस्थेच्या बाहेर पडू शकत नाहीत, अशा लोकांकरिता आता वॅक्सिन ऑन व्हिल्स मोबाईल व्हॅन उपक्रमांतर्गत थेट संबंधित व्यक्ती जिथे असेल, तिथे लसीकरण केले जाणार आहे. या उपक्रमाचे आज उद्घाटन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा अधिकाधिक व्यक्ती लाभ घेतली, असा विश्वास महापौर मोहोळ यांनी व्यक्त केला.
(हेही वाचाः स्तनदा मातांना लसीकरण केंद्रांवर थेट कोविड लस)
Join Our WhatsApp Community