बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. आता पालक आणि विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालाचे वेध लागले आहेत. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. याचे उत्तर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिलं आहे. (Deepak Kesarkar)
केसरकर म्हणाले की, दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर होऊ शकते. मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी निकालाबाबत ही माहिती दिली.
(हेही वाचा – Yoga Quotes: नियमित योगा करण्यासाठी प्रेरणा देणारे १० मौल्यवान विचार कोणते?)
बारावीच्या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केलं आहे. पुढे ते म्हणाले की, बारावीच्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. ज्या मुलांना कमी मार्क मिळाले आहेत, ती मुलं पुन्हा बसू शकतात. परीक्षा लवकर घेण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. ‘कोणीही नाराज होऊ नये. संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा. दहावीचा निकाल २७ मे रोजी लागू शकतो’, असेही ते म्हणाले.
आरटीई घोटाळ्याबाबत त्यांनी सांगितले की, याला घोटाळा म्हणता येणार नाही. कोणीही खोटी कागदपत्रे तयार करू नयेत, जिल्हास्तरावर गुन्हा नोंदवला जाईल. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.
हेही पहा –