Pune Accident Case: पुण्यातील ‘त्या’ २ पबवर कारवाई होणार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आदेश

अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे.

190
Pune Accident Case : बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा; Ambadas Danve यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुण्यातील कल्याणीनगर येथे शनिवारी मध्यरात्री भरधाव आलिशान पोर्शे कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. या दोन्ही व्यक्ती अभियंता असून ते मूळचे मध्य प्रदेशातील आहेत.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एका रेस्टॉरंटमध्ये गेला. मित्रांसोबत रात्री ९.३० ते मध्यरात्रीपर्यंत मित्रांसोबत दारू आणि खाद्यपदार्थांवर ४८,००० रुपये खर्च केले होते. त्यानंतर तो अजून एका हॉटेलमध्ये मध्यरात्री १ वाजेपर्यंत दारू प्याला. त्यानंतर तो मित्रांसोबत आलिशान पोर्श कारमधून भरधाव निघाला. १२वीचा निकाल लागल्यानंतर मध्यरात्री पार्टी करण्यासाठी पार्टी करण्यासाठी तो गेला होता.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : दिल्लीत उष्णतेची लाट; मतदानावर परिणाम होण्याची शक्यता )

पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज तपासले असून त्यामध्ये टेबलावर दारूच्या बाटल्यांचा खच पण दिसत आहे. अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात नमन भुतडा, सचिन काटकर, संदिप सांगळे आणि जयेश बनकर या चार आरोपींना अटक केली आहे. यांचा संबंध कॉसी रेस्टॉरंट आणि ब्लॅक हॉटेलशी आहे.

फ्री प्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कल्याणीनगर येथे मध्यरात्री हा अपघात झाला. अल्पवयीन मुलांना दारू पुरवल्याप्रकरणी कोरेगाव पार्क येथील हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड (कोझी) आणि पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर (ओक वुड) मॅरियट सूट-ब्लॅक या दोन्ही हॉटेल आणि परमिट रूम तसेच पबचे आस्थापनाविषयक व्यवहार जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशाने तात्काळ बंद केले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई?
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने पुणे शहरातील सर्व पब्ससह इतर परमिट रूमची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. परवानाधारक हॉटेल, पबमध्ये अल्पवयीन मुलांना कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येऊ नये. पहाटे १.३० नंतर कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येऊ नये. नोकरनामधारक महिला वेटर्समार्फत रात्री ९.३० नंतर कोणतीही विदेशी दारू सर्व्ह करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

आस्थापनांवर गुन्हे नोंदवणार
बॉम्बे प्रोहिबिशन कायदा १९४९ आणि बॉम्बे फॉरेन लिकर नियम १९५३ अंतर्गत येणाऱ्या विविध तरतुदी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर गुन्हे नोंदविण्यात येणार आहेत. संबंधित हॉटेल, पब आणि आस्थापनेला मद्य विक्रीबाबत देण्यात आलेले परवाने निलंबित अथवा रद्द करण्यात येईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांनी दिली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.