सर आर्थर इग्नेशियस कॉनन डॉयल (Arthur Conan Doyle) हे ब्रिटिश लेखक आणि वैद्यकीय चिकित्सक होते. त्यांनी १८८७ मध्ये ’अ स्टडी इन स्कार्लेट’ या कादंबरीमध्ये शेरलॉक होम्स हे पात्र तयार केले. होम्स आणि डॉ. वॉटसन यांच्यावर चार कादंबऱ्या आणि छप्पन कथा त्यांनी लिहिल्या. शेरलॉक होम्सच्या कथा प्रचंड गाजल्या. आजही या कथा वाचकांना भुरळ पाडतात. (Arthur Conan Doyle)
सर डॉयलचा (Arthur Conan Doyle) जन्म २२ मे १८५९ रोजी एडिनबर्ग, स्कॉटलंड येथे झाला. त्यांचे वडील चार्ल्स अल्टामोंट डॉयल हे आयरिश कॅथोलिक वंशाचे होते आणि आई, मेरी ही आयरिश कॅथोलिक होती. आर्थर डॉयल हे एक महान लेखक तर होतेच, त्याचबरोबर ते चिकित्सक होते. विशेष म्हणजे ते फुटबॉलपटूही होते. तसेच ते क्रिकेटही खेळले आहेत. त्यांना अनेक खेळांची आवड होती. (Arthur Conan Doyle)
(हेही वाचा – Water Cut : गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पासाठी जलवाहिनी वळवणार, ईशान्य मुंबईतील नागरिकांचा पाणीपुरवठा ‘या’ दिवशी राहणार बंद)
या कादंबरीने मिळवली आश्चर्यकारक प्रसिद्धी
द स्टडी इन स्कार्लेट ही कादंबरी त्यांनी वयाच्या २७ व्या वर्षी लिहिली. मात्र पहिली कादंबरी प्रकाशित करताना त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. २० नोव्हेंबर १८८६ मध्ये वॉर्ड लॉक ऍंड कंपनीने प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारली. पुढे या कादंबरीला आश्चर्यकारक प्रसिद्धी मिळाली आणि शेरलॉक होम्सने जगावर राज्य केले. (Arthur Conan Doyle)
सर डॉयल (Arthur Conan Doyle) म्हटले तर आपल्याला होम्स आठवतो. मात्र त्यांनी विपुल लेखन केले आहे. प्रोफेसर चॅलेंजर हे देखील त्यांचे एक गाजलेले पात्र आहे. विशेषतः हे विज्ञान कथेतील महत्वाचं पात्र आहे. नेपोलियन सैनिक ब्रिगेडियर जेरार्ड यांच्यावर विनोदी कथा लिहिल्या आहेत. तसेच नाटके, कविता, नॉन-फिक्शन आणि ऐतिहासिक कादंबर्या देखील त्यांनी लिहिल्या आहेत. मात्र शेरलॉक होम्सने जी प्रसिद्धी मिळवली ती इतर साहित्यकृतींना मिळू शकली नाही. (Arthur Conan Doyle)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community