BMC : महापालिका मुख्यालय इमारतीतील छत कोसळले, सुट्टी असल्याने अधिकारी वाचले

4214
BMC : महापालिका मुख्यालय इमारतीतील छत कोसळले, सुट्टी असल्याने अधिकारी वाचले

मुंबई महापालिका मुख्यालयातील जुन्या हेरिटेज इमारतीच्या नुतनीकरणाचे काम करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात तळ मजल्यावरील छताचा भाग कोसळण्याची दुर्घटना सोमवारी (२० मे) घडली. सोमवारी मतदान प्रक्रिया असल्याने महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी वर्ग हा निवडणूक कामासाठी होते, त्याच वेळी छताचा भाग कोसळल्याने याठिकाणी बसणारे अधिकारी व कर्मचारी हे बचावले गेले आहेत. कार्यालयात कोणीही नसताना ही घटना घडल्याने छतासह पाण्याची गळती झाल्याने अधिकाऱ्यांच्या टेबलावरील कागदपत्रे भिजली गेली. अखेर ही कागदपत्रे मंगळवारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सुकवण्याचा प्रयत्न केला. (BMC)

New Project 2024 05 21T215547.640

मुंबई महापालिका जुन्या इमारतीच्या तळ मजल्यावर महापालिका लेखा विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या वरील बाजुस पहिल्या मजल्यावर स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षांचे कार्यालय आहे. परंतु सध्या प्रशासक नियुक्त असल्याने या समिती कार्यालयाच्या जागेत उपायुक्त (पर्यावरण) यांचे कार्यालय होते. परंतु उपायुक्त (पर्यावरण) यांचे कार्यालय नवीन विस्तारीत इमारतीत सहाव्या मजल्यावर तयार झाल्याने त्यांचे कार्यालय नवीन जागेत स्थलांतरीत झाले. त्यामुळे या कार्यालयात लेखा विभागाच्या दक्षता विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयातील बाथरुममध्ये गळती लागल्याने तळ मजल्यावर असलेल्या लेखा विभागातील कार्यालयातील प्लास्टर ऑफ पॅरिसचे फॉल सिलिंगचा भागच कोसळला गेला. या लेखा अधिकारी (रोखे) शहर अश्विनी प्रविण चुरी यांचे हे दालन आहे. (BMC)

New Project 2024 05 21T215657.777

(हेही वाचा – BMC : मुंबईतील नाल्यातून पावसाळापूर्व गाळ काढण्यासाठी अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमा; महापालिका आयुक्तांचे निर्देश)

सोमवारी लेखा अधिकारी (रोखे) शहर यांच्या दालनातील फॉल सिलिंगचा हा भाग कोसळून त्यातील पाण्याची गळती झाली. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या शिट्सचा खच तसेच पाण्याची गळती लेखा अधिकाऱ्यांच्या टेबलावर झाली. यामध्ये टेबलावरील कागदपत्रे पाण्यामुळे भिजली गेली. विशेष म्हणजे सोमवारी निवडणूक मतदान असल्यामुळे तसेच सोमवारी सुट्टी असल्याने हे कार्यालय बंद होते. त्यामुळे मंगळवारी या कार्यालयातील कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहिले तेव्हा त्यांना पडलेल्या फॉल सिलिंगचा भाग आणि पाण्यामुळे भिजलेली कागदपत्रे दिसून आली. त्यामुळे मंगळवारी कार्यालयात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्या टेबलावरील सर्व कागदपत्रे जमा करून पाण्याच्या टाकीवर सुकत घालण्यात आली आहे. सुट्टीच्या दिवशी ही दुर्घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला गेला असला तरी या इमारतीतील कामांबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहे. (BMC)

New Project 2024 05 21T215804.656

याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील नवीन लावलेली कौले ही योग्य पध्दतीने न लावल्याने मागे अचानक पडलेल्या पावसामुळे समिती सभांमध्ये पाणीच पाणी जमा झाले होते. त्यानंतर या इमारतीची कौले बदलण्याचे काम नव्याने हाती घेण्यात आली. तसेच या मुख्यालयाच्या विस्तारीत इमारतीतील लेखा खात्याच्या अर्थसंकल्प विभागात काही महिन्यांपूर्वीच अशाचप्रकारे फॉल सिलिंग पडण्याची घटना घडली होती. ही घटना ही रात्रीच्या वेळे आणि सुट्टीच्या दिवशी घडल्याने मोठा अनर्थ टळला होता. ज्याठिकाणी हे फॉल सिलिंग कोसळले होते, त्याखालीच लेखा विभागाचे कर्मचारी बसत होते. त्यामुळे कार्यालयीन वेळेत ही घटना घडली असती तर कर्मचाऱ्यांना इजा होण्याची दाट शक्यता होती. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.