Ujani Dam: प्रवासी बोट बुडाली; बचावकार्य सुरू

321
Ujani Dam: प्रवासी बोट बुडाली; बचावकार्य सुरू

इंदापूर जिल्ह्यातील (Indapur district) उजणी धरण पात्रात मंगळवारी सायंकाळच्या वेळी वादळी वाऱ्यांमुळे प्रवासी बोट बुडाली. इंदापूर तालुक्यातील कळाशी येथून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगावकडे ही बोट प्रवास करत होती. यामध्ये सात जण बुडल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. तर यामधील एकाने पोहत आपला जीव वाचवला आहे.  (Ujani Dam)

कळाशीहुन प्रवासी वाहतूक (passenger boat) करणाऱ्या बोटीच्या बाबतीत अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीमध्ये एकूण तीन पुरुष, दोन महिला, दोन लहान मुली असे प्रवासी आणि एक बोट चालक एकूण ८ जण प्रवासी करत होते. बुडालेल्या व्यक्तीचे शोध घेण्याचे काम चालू असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल डोंगरे हे घटनास्थळी पोहोचले.  (Ujani Dam)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: अमित शहांच्या दाव्यामुळे विरोधकांमध्ये भीती, ५ टप्प्यांनंतर किती जागांवर विजय निश्चित? जाणून घ्या…)

सायंकाळच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वादळी वारे व पावसाने हजेरी लावल्याने या वादळी वाऱ्याच्या वेगाने आणि पाण्याच्या लाटांनी ही बोट पलटी झाली असल्याचा अंदाज आहे.घटना समजतात बचाव कार्यासाठी महसूल पोलीस प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ पोहचले आहेत. (Ujani Dam)

 हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.