- ऋजुता लुकतुके
२०११ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोणीने सामना संपवताना मारलेला उत्तुंग षटकार कोण विसरेल? धोणीचा तो षटकार म्हणजे भारतीय संघाने संपूर्ण सामन्यात श्रीलंकेवर गाजवलेल्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब होतं. त्या षटकाराची आठवण झाली ती कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात ट्रेव्हस हेडला मारलेल्या शेवटच्या षटकारामुळे. खरंतर श्रेयसने या एकाच षटकात एक नाही तर तीन षटकार आणि एक चौकारही मारला. चौदाव्या षटकांतच कोलकाताला हा सामना ८ गडी आणि ३८ चेंडू राखून जिंकून दिला. कोलकाता संघ आता दिमाखात अंतिम फेरीत पोहोचला आहे. तर सनरायझर्स हैद्राबादला एलिमिनेटर विजेत्या संघाशी दुसरा क्वालिफायर सामना खेळावा लागणार आहे. (IPL 2024, KKR in Finals)
(हेही वाचा- Indian Cricketer: सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलेले ‘हे’ आहेत माजी भारतीय क्रिकेटर ?)
बाद फेरीच्या पहिल्या सामन्यात पूर्णपणे कोलकाता नाईट रायडर्सचं वर्चस्व दिसून आलं. हैद्राबादचा कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतली खरी. पण, ही एक गोष्ट सोडली तर काहीच त्याच्या मनासारखं झालं नाही. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर ट्रेव्हिस हेड, नितिश कुमार रेड्डी आणि शाहबाझ अहमद हे झटपट बाद झाले. तर अभिषेक अरोरालाही अरोराने बाद केलं. राहुल त्रिपाठीच्या ५५, हेनरिक क्लासेनच्या ३२ आणि पॅट कमिन्सच्या ३० धावांमुळे निदान हैद्राबादने दीडशेचा टप्पा ओलांडला. त्यांनी कोलकातासमोर विजयासाठी १६० धावांचं आव्हान ठेवलं. अहमदाबादच्या दव पडलेल्या वातावरणात हे आव्हान कोलकाताने अगदी लीलया पार केलं. (IPL 2024, KKR in Finals)
🥁 We have our first FINALIST of the season 🥳
𝗞𝗼𝗹𝗸𝗮𝘁𝗮 𝗞𝗻𝗶𝗴𝗵𝘁 𝗥𝗶𝗱𝗲𝗿𝘀 💜 are one step closer to the ultimate dream 🏆
Scorecard ▶️ https://t.co/U9jiBAlyXF#TATAIPL | #KKRvSRH | #Qualifier1 | #TheFinalCall pic.twitter.com/JlnllppWJU
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2024
रहमतुल्ला गुरबाझ (Rahmatullah Gurbaz) आणि सुनील नरेन (Sunil Narine) यांनी ४४ धावांची सलामी संघाला करून दिली. दोघं बाद झाल्यावर वेंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी नाबाद ९७ धावांची भागिदारी करत कोलकाताला विजय मिळवून दिला. कोलकाताचा एकही फलंदाज अडचणीत सापडलेला दिसला नाही. इतका त्यांचा हा विजय सहज साध्य वाटत होता. पॅट कमिन्स आणि भुवनेश्वर कुमारचीही धुलाई झाली. (IPL 2024, KKR in Finals)
(हेही वाचा- BMC : महापालिका मुख्यालय इमारतीतील छत कोसळले, सुट्टी असल्याने अधिकारी वाचले)
ट्रेव्हिस हेडच्या १.४ षटकांत तब्बल ३२ धावा निघाल्या. तर नितिश कुमार रेड्डीच्या एका षटकात १३ धावा निघाल्या. कोलकाताने पूर्ण वर्चस्व गाजवत हा विजय मिळवला. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ५५ तर वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) ५१ धावांवर नाबाद राहिले. (IPL 2024, KKR in Finals)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community