Road Footpath :  फुटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करणार; नव्या आयुक्तांचे स्वप्न

Road Footpath :  मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित वार्तालाप मध्ये बोलतांना महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ही ग्वाही दिली.

982
Road Footpath :  फुटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करणार; नव्या आयुक्तांचे स्वप्न
Road Footpath :  फुटपाथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करणार; नव्या आयुक्तांचे स्वप्न
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईकरांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यावर महापालिकेचा भर आहे. पादचाऱ्यांसाठी फुटपाथ मोकळे (Road Footpath) ठेवणे हे मोठे आव्हान आहे.  मात्र, असे असले तरी ते आव्हान स्विकारत पादचाऱ्यांसाठी फुटपाथ मोकळे करण्यात येतील, अशी ग्वाही महापालिका आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी दिली. (Road Footpath)
मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित वार्तालाप मध्ये बोलतांना महापालिका आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी ही ग्वाही दिली.  या प्रसंगी सेवानिवृत्त आय एम एस आर सी सिन्हा, आर्किटेक्ट पी के दास व मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरबीत सिंग उपस्थित होते. २० मार्च रोजी आयुक्त पदाची धुरा सांभाळली असून आज दोन महिने झाले. बदलत्या मुंबईचे आम्ही साक्षीदार आहोत. मुंबईच्या विकासासाठी आवश्यक त्या गोष्टी करण्यावर भर देण्यात येईल, असे ही भूषण गगराणी म्हणाले. (Road Footpath)
New Project 18 1
कोस्टल रोड अटल सेतू पुलामुळे मुंबईला नवी ओळख आयटी क्षेत्रामुळे पुण्याची ओळख – डॉ. गगराणी
मुंबई : आयटी क्षेत्रामुळे पुण्याची ओळख निर्माण झाली. गेल्या काही वर्षांत पुण्याचा विकास झाला, त्यामुळे पुणे आज जगाला पुणे माहीत झाले. न्हावा शिवा अर्थात अटल सेतू (Atal Setu) व कोस्टल रोडमुळे (Coastal Road) पुढील काही वर्षांत मुंबईत अमुलाग्र बदल होतील. (Road Footpath)
वाणिज्यिक तसेच रहिवासी क्षेत्रात या रियल इस्टेट क्षेत्राचा प्रभाव राहणार आहे. मुंबईकर या बदलात कसे योगदान देतात तसेच प्रकल्पाचा स्वीकार कसा करणार यावर अनेक गोष्टी आधारीत आहेत, असे पालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी स्पष्ट केले. (Road Footpath)
एमएमआरडीएच्या पाच पटीने प्रकल्प खर्च करते  महापालिका
एमएमआरडीएच्या माध्यमातून मुंबईत ५० हजार कोटींची कामे सुरु आहेत. तर मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मुंबईत दोन लाख ५० हजार कोटींची कामे सुरु आहेत. मुंबईतील शिवरेज लेन, पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन या ब्रिटीशकालीन असून महापालिकेच्या माध्यमातून जुन्या   मलवाहिन्या  बदलणे,  जल वाहिन्या बदलणे, ही कामे सुरु आहेत. तर १२० किमी अंतरावरुन मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईकरांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर आहे. पादचाऱ्यांसाठी फुटपाथ मोकळे ठेवणे हे मोठे आव्हान असले तरी ते चॅलेंज स्विकारत पादचाऱ्यांसाठी फुटपाथ मोकळे करण्यात येतील, असेही ते म्हणाले. (Road Footpath)
मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी
पुढील दोन वर्षांत मुंबईत मेट्रोचे जाळे विस्तारले जाईल. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल. सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्यात येत असून मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी आणखी काही करता येईल, यावर लक्ष केंद्रीत केल्याचे गगराणी यांनी स्पष्ट केले. (Road Footpath)
New Project 17 1
रेल्वे जोडणीसाठी पाया रचला
माझी प्रथम ३० वर्षांपूर्वी सिडकोत नियुक्ती झाली त्यावेळी नवी मुंबई नव्हतीच. त्यावेळची लोकसंख्या ३० हजार होती. आठवड्याच्या ७ दिवसांत ३ दिवस रस्त्यांची दुरुस्ती सुरु असायची. टेलिफोन सुविधा नव्हती. रेल्वेही नव्हती. मुंबईपासून जवळ असलेल्या त्यावेळच्या नवी मुंबईला जोडण्यासाठी रेल्वे महत्वपूर्ण हे लक्षात आले आणि रेल्वे जोडणीसाठी पाया रचला आणि पण आज मुंबई आणि नवी मुंबईत काहीच अंतर राहिलेले नाही, असे सेवानिवृत्त आय एम एस आर सी सिन्हा म्हणाले. (Road Footpath)
मुंबई शहर देशातील एकमेव शहर 
महानगरपालिका अनेक नागरी सेवा देताना गरीब श्रीमंत कोणताच भेदभाव करत नाही. पाणी, मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, उद्याने अशा अनेक सेवा सर्व नागरीकांना एकसमान पद्धतीने महानगरपालिकेच्या (BMC) माध्यमातून पुरविण्यात येतात. मुंबईतील विविध सेवा वाहिन्यांचे सुमारे १५ हजार किलोमीटरचे जाळे असणारे मुंबई शहर देशातील एकमेव शहर आहे. शेवटच्या व्यक्तीसाठी वाहतुकीची सुविधा कशा पद्धतीने देता येईल यासाठी मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, बेस्ट उपक्रम यांच्या माध्यमातून सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे, असेही ते गगराणी यांनी सांगितले. (Road Footpath)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.