- ऋजुता लुकतुके
अहमदाबादची खेळपट्टी अचानक एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम लढतीसारखी वागत होती. पहिल्या डावात फिरकीला आणि एकंदरीत गोलंदाजीला साथ देणारी खेळपट्टी रात्री हवेत दव असताना मात्र गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरली. पहिल्या डावात मिचेल स्टार्कचे तेज चेंडू आणि वरुण चक्रवर्तीची फिरकी यापुढे सनरायझर्स हैद्राबादच्या फलंदाजांची मात्र चालली नाही. पहिल्या तीन षटकांतच मिचेल स्टार्कने त्यांची भंबेरी उडवून दिली. दुसऱ्या चेंडूवर ट्रेव्हिस हेडचा (Travis Head) शून्यात त्रिफळा उडला. तर धोकादायक अभिषेक शर्माही तिसरं षटक संपता संपता ३ धााव करून बाद झाला. मग नितिश ९ आणि शाहबाझही शून्यावर बाद झाले. (IPL 2024, KKR in Finals)
(हेही वाचा- Pune Porsche Car Accident: “माझा मुलगा मला परत द्या…” अनिसच्या आईचा काळीज पिळवटणारा आक्रोश)
एकेक हैद्राबादचा फलंदाज तंबूत परतत असताना कोलकाताच्या गोटात सेलिब्रेशनला सुरुवात झालेली दिसली. स्टार्कची तेज गोलंदाजी कशी खेळायची याचा हैद्राबादच्या फलंदाजांना अंदाज येत नव्हता. आणि प्रत्येक बळी कोलकाताच्या पाठिराख्यांमध्येही उत्साह पसरवत होता. संघाचा मालक शाहरुख खानची (Shah Rukh Khan) मुलं सुहाना (Suhana) आणि अबराम (Abram) यांनी तर तेव्हापासूनच जल्लोष सुरू केला होता. शाहरुख खान (Shah Rukh Khan) तेव्हा तिथे उपस्थित होता. पण, जल्लोषासाठी तो कदाचित विजयाची औपचारिकता पूर्ण होण्याची वाट पाहत असावा. (IPL 2024, KKR in Finals)
संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरही डगआऊटमध्ये खुश दिसत होता. (IPL 2024, KKR in Finals)
Shah Rukh Khan, Suhana Khan, Abram Khan & Pooja Dadlani celebrating after 2 back to back wickets 🔥💜#ShahRukhKhan #KKRvsSRHpic.twitter.com/BVX8JqQ41x
— Shah Rukh Khan Warriors FAN Club (@TeamSRKWarriors) May 21, 2024
Gambhir represents the mood rn 🔥#KKRvsSRH
pic.twitter.com/r5Na7yQU2Q— Johns (@JohnyBravo183) May 21, 2024
सनरायझर्स हैद्राबादचा (SRH) संघ निर्धारित २० षटकांत १५९ धावांच करू शकला. पण, हे आव्हान कोलकाता संघाने लीलया ८ गडी आणि ३८ चेंडू राखून पार केलं. कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) १४ व्या षटकात ३ षटकार आणि एक चौकार वसूल करत सामना आक्रमक पद्धतीने संपवला. ३४ धावांत ३ बळी टिपणारा स्टार्क सामनावीर ठरला. या विजयासाह कोलकाता संघाने आता चौथ्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे. बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांदरम्यान एलिमिनेटर सामना रंगणार आहे. हा सामना जिंकलेला संघ सनरायझर्स हैद्राबादशी दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दोन हात करेल. आणि त्यांच्यातील विजेता संघ अंतिम फेरीत कोलकाताशी २६ तारखेला भिडेल. (IPL 2024, KKR in Finals)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community