Badminton News : सात्त्विकसाईराज, चिराग पुरुषांच्या दुहेरीत पुन्हा अव्वल 

Badminton News : गेल्याच आठवड्यात या भारतीय जोडीने थायलंड ओपन स्पर्धा जिंकली आहे

147
Badminton News : सात्त्विकसाईराज, चिराग पुरुषांच्या दुहेरीत पुन्हा अव्वल 
Badminton News : सात्त्विकसाईराज, चिराग पुरुषांच्या दुहेरीत पुन्हा अव्वल 
  • ऋजुता लुकतुके

जागतिक बॅडमिंटन (Badminton News) क्रमवारीत सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी (Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) या भारतीय दुहेरीतील जोडीने पुन्हा एकदा अव्वल क्रमांक पटकावला आहे. रविवारी भारतीय जोडीने चीनच्या चेन बो यांग आणि लिऊ यी या जोडीचा २१-१५ आणि २१-१५ असा सरळ गेममध्ये पराभव केला होता. थायलंडमध्ये २०१९ नंतर आपलं दुसरं विजेतेपद या जोडीने पटकावलं. त्याचाच फायदा त्यांना आता दुहेरीच्या क्रमवारीत झाला आहे. (Badminton News)

(हेही वाचा- “मातोश्रीचे लाचार श्री होणाऱ्यांना…” Shishir Shinde गजानन कीर्तिकरांवर का कडाडले?)

मंगळवारी जाहीर झालेल्या बॅडमिंटन क्रमवारीत सात-चि जोडी ९९,६७० गुणांसह दोन पायऱ्या वर चढून अव्वल स्थानावर पोहोचली आहे. गेल्यावर्षी आशियाई क्रीडास्पर्धेत भारतीय जोडीने पुरुषांच्या दुहेरीत सुवर्ण जिंकलं होतं. पण, त्यानंतर या जोडीच्या कामगिरीत सातत्य दिसत नव्हतं. त्यामुळेच क्रमवारी वर – खाली होत राहिली. यंदाच्या हंगामात सात्त्विक आणि चिराग (Chirag Shetty) यांनी पटकावलेलं हे दुसरं विजेतेपद आहे. तर एकूण कारकीर्दीत एकत्र मिळवलेलं नववं विजेतेपद.  (Badminton News)

थायलंडमधील विजयानंतर भारतीय जोडी खुश होती. ‘या आठवड्यात आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ पेश केला. चिनी जोडीचं आव्हान सोपं नाही हे आम्हाला पुरतं माहीत होतं. त्यामुळे प्रत्येक गुणासाठी आम्ही सजग होतो. आणि प्रतिस्पर्ध्यांना आम्ही विचार करणयाची संधीच दिली नाही.’ असं थायलंडमधील विजयानंतर चिराग शेट्टीने (Chirag Shetty) बोलून दाखवलं.  (Badminton News)

(हेही वाचा- IPL 2024, Eliminator : दहशतवाद्यांच्या अटकेमुळे एलिमिनेटर सामन्यासाठी अहमदाबादमधील सुरक्षा व्यवस्था वाढवली )

बॅडमिंटन (Badminton News) जागतिक क्रमवारीत भारताच्या दृष्टीने काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. थायलंड ओपन स्पर्धेतच महिलांच्या दुहेरीत उपान्त्य फेरी गाठणाऱ्या अश्विनी पोनप्पा (Ashwini Ponnappa) आणि तनिषा कॅस्ट्रो (Tanisha Castro) यांनीही क्रमवारीत दोन स्थानांची झेप घेऊन १९ वा क्रमांक गाठला आहे. मेराबा लुवांग मसनम या बॅडमिंटनपटूने एच एस प्रणॉय आणि मॅक्स ख्रिश्चनसन यांना हरवलं होतं. त्याच्या जोरावर क्रमवारीत १३ पायऱ्या वर चढत मसनम आता ७१ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. (Badminton News)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.