Pune Car Accident: विशाल अग्रवालवर शाई फेकण्याचा प्रयत्न; वंदे मातरम् संघटना आक्रमक

200
Pune Car Accident: विशाल अग्रवालवर शाई फेकण्याचा प्रयत्न; वंदे मातरम् संघटना आक्रमक

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) याला पोलिसानी बुधवारी न्यायालयात हजर केले असता पुण्यातील वंदे मातरम् संघटनेच्या (Vande Mataram Organization) वतीने त्यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंदे मातरम् संघटने कडून करण्यात आली आहे. तर संघटनेच्या वतीने अल्पवयीन मुलगा जेवढा जबाबदार आहेत, त्याचे वडील देखील तेवढेचे जबाबदार असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.  (Pune Car Accident)

त्या अल्पवयीन मुलावर कठोर कारवाई व्हावी यासाठी बुधवारी आम्ही विशाल अग्रवालला धडा शिकवण्यासाठीच वंदे मातरम् संघटनेच्या वतीने त्याचे तोंड काळे (Ink Throw) करण्यासाठी आम्ही आलो होतो. मात्र पोलिसांनी आम्हाला अडवले. असे विधान वंदे मातरम संघटनेचे अध्यक्ष सचिन जामगे यांनी केले. विशाल अग्रवालच्या मुलाने जो प्रकार केला आहे, त्याच्या मुलाने दोन निष्पाप जीव घेतले आहेत. आरोपीवर आधीही काही गुन्हे दाखल आहेत. हा एका मोठ्या गँगशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. सदरील घटनेला जेवढा मुलगा जबाबदार नाही, त्यापेक्षा जास्त त्याचे वडील जबाबदार आहेत. वडीलांनी मुलाला गाडी दिल्यामुळेच हा अपघात झाला असल्याचे वंदे मातरम संघटनेने म्हटले आहे. रात्री ११ नंतर पब चालू ठेवू नये, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना आणि सहन करणार नसल्याचे वंदे मातरम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – Pune Car Accident प्रकरणाचं राजकारण करणाऱ्या राहुल गांधीना फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर!)

अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी जिल्हा न्यायालयात हजर केले. नागरिकांचा विशालवरचा राग दिसत होता. पोर्शेच्या घटनेवर बाल न्यायालयात चर्चा पूर्ण झाली असून, न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. बुधवारी दुपारी चार वाजता निर्णय होईल. अल्पवयीन आरोपीच्या वकिलाने युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. सध्या सरकारी वकील न्यायालयात बाजू मांडत आहेत.

मृतांच्या पालकांनी शिक्षेची मागणी केली

दरम्यान, पुणे पोर्शेच्या घटनेत पालकांनी आरोपी मुलासह त्याच्या पालकांनाही जबाबदार धरले पाहिजे तसेच कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी मृताच्या पालकांकडून होत आहे. पुण्यात मोटारसायकलवरून जात असताना मध्य प्रदेशातील अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा यांचा मृत्यू झाला. तेव्हा उद्योगपतीच्या मुलाने  त्याला चिरडले होते. अश्विनी ही मध्य प्रदेशातील जबलपूरची, तर अनिश राज्यातील उमरिया जिल्ह्यातील बिरसिंगपूर पाली येथील रहिवासी होता.(Pune Car Accident)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.