Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या दगदगीनंतर नेते होत आहेत रिलॅक्स

176
Lok Sabha Election 2024 : सातव्या टप्प्यात कुणा-कुणाची आहे अग्निपरीक्षा?

१८व्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रणधुमाळीत प्रचारफेऱ्या, रोडशो तसेच जाहीर सभांचा धुराळा उडाला होता. यामध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते जीव तोड मेहनत घेत होते. आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी निवडणुकीचे रान पेटवले होते. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या आणि आता नेते तसेच कार्यकर्ते काहीसे रिलॅक्स झालेले दिसून येत आहेत. (Lok Sabha Election 2024)

चंद्रकांत पाटील सहकुटुंब महाबळेश्वरला

निवडणुकांच्या गरमा-गरमीतून बाहेर पडल्यानंतर आता नेतेमंडळीही पर्यटन व कुटुंबासोबत फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करताना दिसून येत आहेत. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही पत्नीसमवेत महाबळेश्वर गाठून येथील हिरव्यागार निसर्गाचा व कडाक्याच्या उन्हात मिळणाऱ्या अल्हाददायक गारव्याचा मनमुराद आनंद घेतला. कडाक्याच्या उन्हापासून काहीसा दिलासा मिळावा, थंड हवेच्या ठिकाणी निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यावा म्हणून पर्यटकांची महाबळेश्वरमध्ये मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीमध्ये नेते आणि अधिकारी देखील मोठ्या प्रमाणात दिसून येतात. यामुळेच मंत्रालयात अधिकारी तसेच नेत्यांची देखील वर्दळ कमी झाली आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: गजानन किर्तीकर म्हणाले, अमोल जिंकला तर …)

जवळपास मागील दोन महिन्यांपासून आचारसंहिता आणि निवडणुकीच्या प्रचारामुळे नेते तसेच अधिकारी देखील निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त होते. २० मे रोजी म्हणजेच दोन दिवसाआधी शेवटचा टप्पा महाराष्ट्रात पूर्ण झाला. त्यानंतर निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेले काही अधिकारी देखील रिलॅक्स झाले आणि मग थेट कुटुंबासमवेत थंड हवेच्या ठिकाणी अधिकारी देखील पोहोचले. (Lok Sabha Election 2024)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र दिल्लीत

राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपाचे स्टार प्रचारक नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मात्र याला अपवाद ठरले आहेत. देशभरात निवडणुकीचे अजूनही दोन टप्पे बाकी असल्याने राज्याबाहेरील प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. बुधवारी दिल्लीमध्ये त्यांचे रोड शो तसेच कॉर्नर मिटिंग देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. राज्यातील लोकसभेच्या निवडणुकांमधील प्रचारात सर्वाधिक प्रचारसभा घेणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव नेते ठरले आहेत. त्यांच्या या मेहनतीचा निकाल येणाऱ्या चार जूनला जाहीर होणार आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.