Harbhajan Singh : भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी हरभजन सिंग उत्सुक?

Harbhajan Singh : संधी मिळाल्यास अवश्य विचार करू असं हरभजन अलीकडेच म्हणाला आहे.

147
Harbhajan Singh : भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी हरभजन सिंग उत्सुक?
  • ऋजुता लुकतुके

भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) संधी मिळाल्यास भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्यास तयारी दाखवली आहे. संघाचा प्रशिक्षक होणं म्हणजे काही खेळाडूंना कौशल्य शिकवणं नाही, तर संघ व्यवस्थापनाचा त्यात मोठा वाटा आहे, असं त्याला वाटतं. ‘मी अर्ज करेनच असं नाही. पण, क्रिकेटने मला खूप काही दिलं आहे आणि त्याची परतफेड करण्याची संधी मिळाली, तर मी नक्की त्याचा विचार करेन,’ असं हरभजन म्हणाला. (Harbhajan Singh)

हरभजन सिंग (Harbhajan Singh) सध्या आयपीएलसाठी टीव्हीवर समालोचनाचं काम करत आहे. त्यादरम्यान झालेल्या चर्चेत त्याने आपलं हे मत मांडलं आहे. अर्थात, बीसीसीआयशी त्याने याविषयी संपर्क केला आहे की, नाही याविषयी स्पष्टता नाही. (Harbhajan Singh)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : बाबासाहेब आंबेडकर यांचे तिसरे नातू पंजाबमधून मैदानात)

बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी सध्या अर्ज मागवले आहेत. २६ मे ही अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाल जून २०२४ मध्ये संपत आहे. त्यानंतर जुलै २०२४ ते डिसेंबर २०२७ या कालावधीसाठी नवीन नियुक्ती होणार आहे. म्हणजे नवीन प्रशिक्षक मुख्यत्वे २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत संघाबरोबर असेल. बीसीसीआय (BCCI) यंदा परदेशी प्रशिक्षकाचा पर्यायही तपासून पाहत आहे आणि चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांच्याकडेही बीसीसीआयने प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. (Harbhajan Singh)

पण, साडेतीन वर्षाच्या कालावधीसाठी परदेशी प्रशिक्षक तयार होतील का, हा प्रश्न आहे. अशावेळी हरभजनने (Harbhajan Singh) देशांतर्गत पर्याय दिला आणि संघातील इतर खेळाडूंना तो रुचला तर बीसीसीआय त्याचाही विचार करेल का, हे आता पहायचं आहे. (Harbhajan Singh)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.