भारतात मागील काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीच्या (online fraud) घटना वाढत चालल्या आहेत. आर्थिक व्यवहारात कोणताही गोष्टींची बाजू न बघता झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकांनी आपल्या आयुष्यभराची जमापुंजी गमावली आहे. लोकांची आर्थिक फसवणूक (financial fraud) करण्यासाठी गुन्हेगार वेगवेगळ्या स्कीम बाजारात आणत असतात. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून चांगला परतावा देण्याचं आमिष दाखवून अनेकांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना घडल्या आहेत. अशीच घटना अमरावतीमध्ये (Amravati fraud scheme) घडली आहे. तसेच जानेवारी ते २० मे २०२४ या कालावधीत जिल्ह्यात २७३ प्रकरणांत १ कोटी ९७ लाख ७५ हजार ५६ रुपयांची फसवणूक झाली असून, १८ लाख ९० हजार ३७६ रुपयाची रक्कम बॅंकेत होल्ड करण्यात आली आहे. (Share Market fraud)
अलीकडच्या काळात ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे वाढू लागले आहेत. विविध प्रलोभन, आमिष दाखवून ऑनलाईन पद्धतीने गंडा घालण्याच्या प्रकरणांत वाढ होत आहे. इतरांची फसवणूक झालेली प्रकरणे उजेडात आल्यानंतरही अनेकांना झटपट श्रीमंत होण्याचा मोह आवरत नसल्याचे, दिवसागणित उघडकीस येणाऱ्या फसवणुकीच्या घटनांवरून अधोरेखित होत आहे. वाशिमसारख्या छोट्याशा जिल्ह्यातही ट्रेडींगच्या भुलभुलय्यात, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकजण फसवणुकीच्या जाळ्यात अलगद अडकत असल्याचे सायबर पोलिस स्टेशनच्या आकडेवारीवरून समोर येत आहे.
(हेही वाचा – Kushti Olympic Quota : ऑलिम्पिकसाठी निवड चाचणी नाही, कोटा मिळवलेले खेळाडूच पॅरिसला जाणार)
फसवणूक झाल्यावर काही जण बदनामीच्या भीतीपोटी तक्रार देण्याचेही टाळतात. वाशिम जिल्हा सायबर पोलिस स्टेशनला मागील पाच महिन्यांत ऑनलाईन फसवणुकीच्या २७३ घटनांची नोंद आहे. तब्बल १ कोटी ९७ लाख ७५ हजारांची फसवणूक झाली आहे. फसवणुकीच्या संभाव्य घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिस दलाने केले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community