Lok Sabha Election 2024 : पीओकेवर बोलताना इंडि आघाडीच्या उमेदवाराची जीभ घसरली!

203
Lok Sabha Election 2024: पीओकेवर बोलताना इंडिया आघाडीच्या उमेदवाराची जीभ घसरली!
Lok Sabha Election 2024: पीओकेवर बोलताना इंडिया आघाडीच्या उमेदवाराची जीभ घसरली!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पाकव्याप्त काश्मीरचा भारतामध्ये (Lok Sabha Election 2024) समावेश करण्याबद्दल वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना इंडि आघाडीच्या उमेदवाराची जीभ घसरल्याचे दिसते आहे. अमित शाह यांच्या या वक्तव्यावर भदोही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ललितेश त्रिपाठी (Lalitesh Tripathi) यांनी टीका केली आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा –Pune Porsche Car Accident: अग्रवाल आणि पवार कुटुंब निकटवर्तीय? नितेश राणेंनी केला खुलासा)

“भाजपाला विकासाच्या मुद्यावर जनसमर्थन मिळत नाही. विकासाच्या मुद्यावरुन निवडणुकीला भरकटवण्यासाठीच सरकार असे मुद्दे काढतेय.” असं ललितेश त्रिपाठी म्हणाले. यानंतर ललितेश त्रिपाठी पीओकेच्या मुद्द्यावर बोलत होते. “भारत सरकार जर पीओके परत घेण्याबद्दल बोलत असेल. याचाच अर्थ तुम्ही दुसऱ्या देशाची जमीन घेण्याची आणि युद्धाची घोषणा करताय. पीओके एकवेळ भारताचा भाग होता. एका राजकीय मंचावरुन युद्धाची घोषणा करु नये. देशाची बेसिक गोष्टींसाठी झुंज सुरु असताना ही युद्धावर जाण्याची वेळ नाही.” असं ललितेश त्रिपाठी म्हणाले. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा –Crime News: जळगावातील धक्कादायक कृत्य! जुन्या वादातून तरुणाची हत्या)

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. काँग्रेस पक्ष 17 जागांवर निवडणूक लढवत आहे. उत्तर प्रदेशात इंडि आघाडीचे नेतृत्व समाजवादी पार्टीकडे आहे. समाजवादी पार्टी 62 जागांवर निवडणूक लढत आहे. भदोहीची सीट इंडि आघाडीने तृणमूल काँग्रेससाठी सोडली आहे. ललितेश त्रिपाठी या जागेवरुन निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवत आहेत. इंडि आघाडी उत्तर प्रदेशात 80 पैकी 79 सीट जिंकणार असा अखिलेश यादव यांचा दावा आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.