निवडणूक संपल्याने सर्वांनीच निश्वास सोडला असला तरीही अजित पवार गट अजूनही थांबलेला नाही. अजित पवार गटाने येत्या रविवारी महत्त्वाची बैठक बोलावली असून या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीचा आखाडा संपताच अजित पवार आता विधानसभेच्या तयारीला लागल्याचे मानले जात आहे. तरी ही खरोखर पुढील तयारीसाठी बैठक आहे की आणखी काही कारणे आहेत याच्या चर्चा मात्र सुरु आहेत. (Lok Sabha Election 2024)
नेमके काय घडतयं ?
आधी आपण नेमके काय घडतेय ते पाहुयात त्यानंतर त्याची कारणे पाहुयात. तर आता लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गट जोमाने सक्रिय झाला असून येत्या २७ तारखेला सर्व आमदारांची बैठक मुंबईत बोलवण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024)
या बैठकीत लोकसभा मतदारसंघांबाबत चर्चा केली जाणार असून मित्र पक्षांनी दिलेले सहकार्य त्यांनी केलेलं मतदान त्यांच्यामुळे झालेला फायदा आदींची मुंबईच्या गरवारे क्लबमध्ये या बैठकीत चर्चा होणार आहे अशी माहिती मिळाली आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Crime News: जळगावातील धक्कादायक कृत्य! जुन्या वादातून तरुणाची हत्या)
निकालानंतर आमदारांमध्ये चलबिचल होऊ नये म्हणून प्रयत्न ?
आता मुंबईमधील या बैठकीला सर्वच आमदार बोलावले असल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. काही आमदार असे म्हणतायेत की, निवडणूक निकालानंतर आमदारांमध्ये चलबिचल होऊ नये म्हणून ही बैठक आयोजित केली असेल. जर खरोखर असे असेल तर अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये खरोखर चलबिचल आहे का असाही सवाल या निमित्ताने व्यक्त होत आहे. (Lok Sabha Election 2024)
पुढील रणनीती महत्त्वाची…
अजितदादा गटाच्या या बैठकीस वरिष्ठ नेते देखील उपस्थित राहतील. स्वतः अजित पवार या बैठकीला संबोधित करतील. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जो निकाल येईल त्यानंतर काय रणनीती आखायची तसेच शरद पवार गटाला अधिक जागा मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती साधारण कशा पद्धतीची निर्माण होईल याबाबत चर्चा, रणनीती या बैठकीत केली जाईल अशी सध्या चर्चा आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community