रेसकोर्स आवारातील १२०० मिलिमीटर व्यासाच्या बटरफ्लाय व्हॉल्व्हच्या दुरुस्ती कामामुळे जी दक्षिण विभागातील बीडीडी चाळ, डिलाईल मार्ग, करी रोड आणि लोअर परळ भागात शुक्रवारी २४ मे २०२४ रोजी पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० या तीन तास कालावधीतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा वापर जपून आणि काटकसरीने करण्याचे आवाहन महापालिका जलअभियंता विभागाने केले आहे. (Water Cut)
रेसकोर्स आवारातील बटरफ्लाय व्हॉल्व्हच्या टेलपीस सॉकेट जॉइंटमधून दिनांक २२ मे २०२४ रोजी रात्री मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे आढळले. खालच्या बाजूचा लीड जॉइंट पूर्णपणे बाहेर आल्याचे निदर्शनास आले. जल अभियंता विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत त्याची पाहणी केली. या व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम गुरुवारी २३ मे २०२४ रोजी रात्री युद्धपातळीवर हाती घेण्यात येत आहे. त्यापूर्वी, जी दक्षिण आणि जी उत्तर विभागात गुरुवारी २३ मे २०२४ रोजी दुपारी आणि सायंकाळी नियमित वेळेत पाणीपुरवठा केला जात आहे. (Water Cut)
(हेही वाचा – Veer Savarkar : ‘शिवसंस्कार चित्रकाव्य कला दालना’चे उद्घाटन)
पाणीपुरवठा नियमित आणि पुरेशा दाबाने होण्यासाठी व्हॉल्व्ह दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यानुसार गळती दुरुस्तीचे काम गुरुवारी २३ मे २०२४ रोजी रात्री १० वाजता हाती घेण्यात येणार आहे. पाण्याच्या उच्च दाबामुळे व्हॉल्वच्या सांध्यामध्ये शिसे (लीड जॉइंट) ओतणे शक्य नाही. त्यासाठी जलवाहिनीचे अलगीकरण केले जाणार आहे. हे काम उद्या दुपारपर्यंत पूर्ण होईल. परिणामी शुक्रवारी २४ मे २०२४ रोजी जी दक्षिण विभागातील बीडीडी चाळ, डिलाईल मार्ग, करी रोड आणि लोअर परळ भागाला पहाटे ४.३० ते सकाळी ७.३० या वेळेत नियमित दिला जाणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. (Water Cut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community