Rafael Nadal : नदालच्या तंदुरुस्तीची चर्चा रंगलेली असताना नदालचा फ्रेंच ओपनसाठी सराव

Rafael Nadal : नदाल फ्रेंच ओपनसाठी रोलँड गॅरोसवर पोहोचला आहे. 

210
Rafael Nadal : नदालच्या तंदुरुस्तीची चर्चा रंगलेली असताना नदालचा फ्रेंच ओपनसाठी सराव
  • ऋजुता लुकतुके

तब्बल १४ वेळा फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम जिंकलेला राफेल नदाल (Rafael Nadal) यावर्षीही पॅरिसला रोलँड गॅरोसवर पोहोचला असून त्याने सराव सुरू केला आहे. स्पर्धेपूर्वी आपली तंदुरुस्ती आणि स्पर्धेची तयारी तो जोखणार आहे. स्पर्धेचं मुख्य स्टेडिअम फिलीप कॅटरिअर इथं तो मंगळवारी दुपारी आपले प्रशिक्षक कार्लोस मोया आणि काही साथीदारांबरोबर आला तेव्हा त्याला पाहायला चाहत्यांनी गर्दी केली होती. जवळ जवळ ६,००० लोक त्याची वाट बघत तिथे उभे होते. (Rafael Nadal)

नदालने साधारण दीड तास तिथे सराव केला आणि त्यानंतर लॉकर रुमकडे जाण्यापूर्वी त्याने शेकडो लोकांना स्वाक्षरी दिली. मागच्या २ वर्षांत नदाल (Rafael Nadal) रोलँड गॅरोस इथं खेळलेला नाही. त्यामुळे या सरावाचं महत्त्व विशेष होतं. इथल्या लाल मातीशी पुन्हा जुळवून घ्यायचं आणि तंदुरुस्तीचा आढावा घ्यायचा हे महत्त्वाचं उद्दिष्ट नदाल आणि त्याच्या प्रशिक्षकांच्या चमूने ठेवलं होतं. नदाल सध्या पाठीच्या दुखापतीने बेजार आहे. २०२३ चं वर्ष तो सलग खेळू शकलेला नाही. त्यानंतर २०२४ मध्ये त्याने पुनरागमनाचा प्रयत्न केला. पण, तो अपयशी ठरला. आताही क्लेकोर्ट हंगामात माद्रिद आणि रोम इथं तो दुसऱ्या फेरीत बाहेर पडला आहे. (Rafael Nadal)

(हेही वाचा – Lok Sabha Elections : राजकीय कुंपणावरील इच्छुक कोलांटउड्या मारण्याच्या तयारीत, निवडणूक निकालाकडे लक्ष)

नदाल फ्रेंच ओपनसाठी तयार आहे का? 

इटालियन ओपन स्पर्धेतही दुसऱ्याच फेरीत नवख्या ह्‌युबर्ट हरकाझकडून त्याला १-६ आणि ३-६ असा सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यामुळे फ्रेंच ओपनसाठी तो तयार आहे का, असा प्रश्न साहजिकच लोकांना पडला आहे. ‘काय होतं ते नेमकं बघू तरी. मला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उद्या कसं वाटतं, त्यानंतरच्या प्रत्येक दिवशी कसं वाटतं, हे मला पाहायचं आहे आणि त्यानंतरच मी निर्णय घेऊ शकेन,’ असं नदाल इटलीत म्हणाला होता. (Rafael Nadal)

नदालचं व्यावसायिकदृष्ट्या हे शेवटचं वर्ष असेल असा अंदाज आहे. पण, या वर्षीही त्याला दुखापतींचा कमी त्रास होत नाहीए. त्यामुळेच फ्रेंच ओपन खेळण्यावरही त्याने अजून भाष्य केलेलं नाही. (Rafael Nadal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.