कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बेरोजगारांना रोजगार देण्याच्या नावाखाली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आडून (MIDC) उद्योगपतींच्या घशात भूखंड घालण्याचा घाट घातला आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी गुरुवारी केला. या एमआयडीसी भूखंड घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. (MIDC Plot Scam)
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात ज्या भागात एमआयडीसी (MIDC) प्रस्तावित आहे तेथील जमिनी उद्योगपतींनी विकत घेतल्या आहेत. त्यात बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात फरार झालेला आंतरराष्ट्रीय गुन्हेगार नीरव मोदीचा समावेश आहे. येथे नीरव मोदीने सर्वाधिक जमीन खरेदी केली आहे. शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने जागा घेतलेल्या उद्योगपतींना भरमसाठ मोबदला मिळावा यासाठी विशिष्ठ ठिकाणी एमआयडीसी व्हावी हा रोहित पवार यांचा हट्ट असून स्थानिक शेतकऱ्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोपही पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला. (MIDC Plot Scam)
(हेही वाचा – Lok Sabha Elections : राजकीय कुंपणावरील इच्छुक कोलांटउड्या मारण्याच्या तयारीत, निवडणूक निकालाकडे लक्ष)
या उद्योगपतींच्या नावे आहेत जमिनी
एमआयडीसीसाठी कर्जत-जामखेडच्या पाटेगाव आणि खंडाळा येथील ४५८ हेक्टर म्हणजे जवळपास १२०० एकर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. येथे मूळ जमीनदार, शेतकरी आहेत. काही शेतकरी जमीन द्यायला तयार आहेत तर काही शेतकऱ्यांचा जमीन देण्यास विरोध आहे, असा दावाही पाटील यांनी केला. पाटेगाव, खंडाळा गावात ज्यांनी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत, त्यामध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगार नीरव मोदीची सहा ते सात ठिकाणी जमीन आहे. याशिवाय महाजन, अग्रवाल, पोद्दार, छेडा, खन्ना, जैन, शेट्टी, मेहता, रॉय, शहा, रांभिया, गाला यांच्या नावे जमिनी आहेत. अशा उद्योगपतींना सरकारी मोबदला मिळवून देण्यासाठी लोकांनी रोहित पवार यांना निवडून दिले आहे का? असा सवाल उमेश पाटील यांनी यावेळी केला. (MIDC Plot Scam)
त्यामुळे एमआयडीसी भूसंपादनात जे मूळ शेतकरी आहेत त्यांना मोबदला न मिळता उद्योगपती, व्यापाऱ्यांना, आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला पैसे मिळवून देण्यासाठी रोहित पवार हे बेरोजगार तरुणांच्या नावाखाली एक खोटं चित्र उभे करत आहेत. या घोटाळ्याच्या रोहित पवार यांचा खरा चेहरा समोर आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या भूखंड घोटाळ्याची एसआयटी नेमून चौकशी करावी, अशी मागणी उमेश पाटील यांनी यावेळी केली. (MIDC Plot Scam)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community