Lok Sabha election 2024 : पंजाबचे सीएम कागदावरच मुख्यमंत्री; पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…

173
Lok Sabha election 2024 : पंजाबचे सीएम कागदावरच मुख्यमंत्री; पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…

लोकसभा २०२४ (Lok sabha Election 2024) च्या पाचही टप्प्यातील निवडणुका पूर्ण झाल्या असून, उर्वरित सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील निवडणुका अजून बाकी आहेत. या शेवटच्या टप्प्यातील निवडणूकचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंजाबमधील (Panjab) सातव्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे पंजाबमध्ये गेले होते. या सभेत मोदींनी पंजाबमधील आम आदमी सरकारवर (Aam Aadmi Party) जोरदार हल्लाबोल चढवला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Maan) हे केवळ कागदी घोडे नाचवत आहेत, ते मुळात कागदावरच मुख्यमंत्री आहेत. पुढे मोदी यांनी इंडि आघाडीवर देखील हल्लाबोल केला. (Lok Sabha election 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : काँग्रेस ४० पेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही, अमित शहांचा विरोधी पक्षांवर हल्लाबोल)

प्रचारसभेत पंजाबमधील पटियाला (Panjab Patiyaala) येथील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, २०२४ ची ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. एका बाजूला देश भाजपा आणि एनडीएचा सामना करत आहे तर दुसरीकडे भ्रष्टाचाऱ्यांची इंडि आघाडीची युती आहे. या युतीला ना नेता आहे ना विचार. एका बाजूला मोदी सरकार विमान बनवत आहे. दुसऱ्या बाजूला अण्वस्त्रे नष्ट करण्याचे आवाहन करणारी इंडी आघाडी आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Elections : राजकीय कुंपणावरील इच्छुक कोलांटउड्या मारण्याच्या तयारीत, निवडणूक निकालाकडे लक्ष)

मी आज गुरुंच्या भूमीवर आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. देशाच्या रक्षणासाठी असो की देशाच्या विकासासाठी शीख समाजाने (Sikh society) नेहमीच पुढे येऊन काम केले आहे. इथल्या जनतेने देशाचा विकास शेतीपासून उद्योजकतेपर्यंत केला आहे, पण कट्टर भ्रष्ट लोकांनी पंजाबचे काय केले आहे. येथील औद्योगिक व्यवसाय स्थलांतरित होत आहेत. अमली पदार्थांचा व्यापार फोफावत आहे. वाळू उत्खनन माफिया, ड्रग्ज माफिया आणि शूटर टोळ्यांचे अत्याचार येथे सुरू आहेत. संपूर्ण सरकार कर्जावर चालत आहे. सगळे मंत्री मस्ती करत आहेत आणि जे कागदी मुख्यमंत्री आहेत त्यांना दिल्ली दरबारात हजर राहायला वेळ नाही. बारादरी गार्डन तसेच पहाटेच्या वेळी वॉकला यायचो, जोडीया भाटिया चौकात सहकाऱ्यांसोबत गप्पा मारल्याच्या सगळ्या जुन्या आठवणी मला आठवत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. (Lok Sabha election 2024)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.