Baramati Traffic Police: वाहनांच्या काचांना काळी फिल्म लावणारे रडारवर, बारामतीत १२५ जणांवर कारवाई

219
Baramati Traffic Police: वाहनांच्या काचांना काळी फिल्म लावणारे रडारवर, बारामतीत १२५ जणांवर कारवाई

शहरातील वाहतूक पोलिसांनी (Baramati Traffic Police) चारचाकी वाहनांच्या काचांना काळी फिल्म (काळ्या काचा) बसविणाऱ्या वाहनचालकांविरुध्द जोरदार मोहीम राबविली. या अंतर्गत तब्बल सव्वा लाखांचा दंड पोलिसांनी वसूल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव (Chandrashekhar Yadav)यांनी दिली.

काळ्या काचा असलेल्या १२५ वाहनांना १ लाख २४ हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला. २ दिवसात विना क्रमांक, फॅन्सी नंबर प्लेट्स (Fancy Number Plates),अतिवेगाने वाहन चालविणे, ट्रिपल सीट, पोलिसांचे आदेश न पाळता निघून जाणे अशा १४५ वाहनांवर कारवाई करून ९३ हजार ४०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

(हेही वाचा – केंद्राच्या दबावामुळे महाराष्ट्रातील गुंतवणूक परराज्यात; Ambadas Danve यांचा आरोप)

पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, वाहतूक शाखा पोलीस अंमलदार अशोक झगडे, सुधाकर जाधव, प्रदीप काळे, प्रकाश चव्हाण, सीमा साबळे, सविता धुमाळ, अजिंक्य कदम, रेश्मा काळे, माया निगडे, सुभाष काळे, योगेश कांबळे, स्वाती काजळे, रुपाली जमदाडे, योगेश कांबळे यांनी केली.

कारवाईचा बडगा कशासाठी ?
बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांचा काळ्या काचा करण्याकडे जास्त कल आहे हे आढळून आले आहे. बारामती वाहतूक पोलिसांकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले जाते. विशेष म्हणजे आर्थिक दंड करूनही काहीजण काचांवरील फिल्म काढत नाहीत, हे लक्षात घेत पोलिसांनी या फिल्स काढण्याची कारवाई हाती घेतली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.