Mount Everest वर चढाई करणार्‍या पहिल्या भारतीय महिला कोण होत्या? जाणून घ्या

बचेंद्री पाल यांनी गिर्यारोहणाचा पहिला प्रयत्न वयाच्या १२ व्या वर्षी केला, जेव्हा त्यांनी शालेय वर्गमित्रांसह ४०० मीटरची चढाई केली.

231
Mount Everest वर चढाई करणार्‍या पहिल्या भारतीय महिला कोण होत्या? जाणून घ्या

बचेंद्री पाल (Bachendri Pal) एक भारतीय गिर्यारोहक आहे. १९८४ मध्ये, जगातील सर्वात उंच पर्वत, माउंट एव्हरेस्ट या शिखरावर चढणार्‍या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. बचेंद्री पाल यांनी गिर्यारोहणाचा पहिला प्रयत्न वयाच्या १२ व्या वर्षी केला, जेव्हा त्यांनी शालेय वर्गमित्रांसह ४०० मीटरची चढाई केली. बचेंद्री पाल यांचा जन्म १९५४ मध्ये नाकुरी, उत्तरकाशी, उत्तराखंड येथे झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बचेंद्री यांनी बी.एड. पर्यंतचा अभ्यास पूर्ण केला. शिक्षित आणि कर्तबगार असूनही त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली नाही. (Mount Everest)

यामुळे त्या निराश झाल्या आणि त्यांनी नोकरी करण्याऐवजी ‘नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग’ या अभ्यासक्रमासाठी अर्ज केला. इथून बचेंद्री (Bachendri Pal) यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. १९८२ मध्ये, त्यांनी शिबिरामध्ये गंगोत्री (६,६७२ मी) आणि रुदुगैरा (५,८१९ मी) ची चढाई पूर्ण केली. या शिबिरात ब्रिगेडियर ज्ञानसिंग यांनी बचेंद्री यांना प्रशिक्षक म्हणून पहिली नोकरी दिली. मात्र, व्यावसायिक गिर्यारोहणाचा व्यवसाय स्वीकारल्यामुळे त्यांना कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. (Mount Everest)

(हेही वाचा – Maharashtra Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांचे सप्टेंबरमध्ये वाजणार बिगुल ?)

या मोहिमेत तयार करण्यात आलेल्या टीममध्ये बचेंद्री (Bachendri Pal) यांच्यासह ७ महिला आणि ११ पुरुषांचा समावेश होता. या संघाने २३ मे १९९८४ रोजी दुपारी १:०७ वाजता २९,०२८ फूट (८,८४८ मीटर) ‘सागरमाथा (एव्हरेस्ट)’वर भारतीय ध्वज फडकवला. एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणार्‍या त्या जगातील ५व्या आणि भारतातीय पहिल्या महिला ठरल्या. त्यांनी ९९४ मध्ये गंगा नदी ओलांडून हरिद्वार ते कलकत्ता या २,५०० किमी एवढ्या नौका मोहिमेचे नेतृत्व केले. (Mount Everest)

तसेच भूतान, नेपाळ, लेह आणि सियाचीन ग्लेशियरमधून हिमालयीन कॉरिडॉरमधून सुरु करुन काराकोरम पर्वत रांगेत ही मोहीम संपवली, सुमारे ४,००० किमी प्रवास त्यांनी केला. विशेष म्हणजे या दुर्गम भागातील पहिली महिला मोहीम होती. २०१९ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण प्रदान करुन सन्मानित केले. (Mount Everest)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.