मुंबईतील शिवसेनेचे मावळते खासदार गजानन कीर्तिकर (MP Gajanan Kirtikar) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कीर्तीकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. किर्तीकरांचे पुत्र आणि उबाठा गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर (Amol kirtikar) यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरून गजानन कीर्तिकर यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबतची तक्रार शिवसेनेच्या शिस्तपालन समितीकडे करण्यात आली आहे. तसेच गजानन कीर्तिकर यांच्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोठे विधान केले आहे. (CM Eknath Shinde)
शिवसेनेत वादाचे कारण ठरलेले गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी उबाठा (UBT) गटाकडून मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून (North West Constituency) निवडणूक लढवली होती. त्यामुळे या निवडणुकीत उघडपणे मुलाला पाठिंबा द्यायचा की पक्षाचे उमेदवार रवींद्र वायकर (Ravidra Waikar) यांचा प्रचार करायचा अशा द्विधा मनस्थितीत गजानन कीर्तीकर सापडले होते. दरम्यान, मतदान आटोपल्यानंतर गजानन कीर्तीकर यांनी मागच्या काही दिवसांमध्ये केलेल्या विधानांमुळे शिवसेनेमध्ये (Shivsena) खळबळ उडाली आहे. गजानन कीर्तीकर यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. त्यांचं माझ्याशी बोलणं झालेलं आहे. त्यावेळी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. आता त्या पुढे काय करायचं याबाबतचा निर्णय पक्ष घेईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
(हेही वाचा – Maharashtra Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांचे सप्टेंबरमध्ये वाजणार बिगुल ?)
दरम्यान, मागच्या काही दिवसांत गजानन कीर्तीकर यांनी उबाठा गटाकडून निवडणूक लढवत असलेले पुत्र अमोल कीर्तीकर यांच्याबाबत अनेक विधानं केली होती. अमोलचं बोट धरुन मी त्याला शिवसेनेत आणलं नाही, तो कष्ट करुन आला आहे. अमोल प्रमाणिक आहे. त्याच्यासोबत टर्निंग पॉईंटला मी नव्हतो, याची खंत कायम राहील असे गजानन कीर्तीकर म्हणाले होते. त्यानंतर शिंदे गटातील नेते शिशिर शिंदे यांनी गजानन कीर्तीकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. तर मुंबई उत्तर पश्चिममधील लढत बिनविरोध करण्याचा कीर्तीकर यांचा डाव होता, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला होता. (CM Eknath Shinde)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community