डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये (Dombivli MIDC Blast ) गुरुवारी (23 मे 2024) रोजी एका केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाल्याची घडना घडली. या स्फोटाप्रकरणी कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिशय भीषण स्वरुपातील या स्फोटामुळे एमआयडीसी भागातील बहुतांश कंपन्यांचं नुकसान झालं, तर स्थानिक रहिवाशांच्या घरांच्या काचाही फुटल्या. आतापर्यंत या स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असून, या दुर्घटनेमध्ये काही कामगार आणि नागिरकांनाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. (Dombivli MIDC Blast )
डोबिंवली एमआयडीसी (Dombivli MIDC Blast ) कंपनी रिअॅक्टर स्फोटाप्रकरणी कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालती प्रदीप मेहता (Malati Pradeep Mehta) आणि मलय प्रदीप मेहता (Malay Pradeep Mehta) या कंपनीच्या मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता आता कारवाईला वेग मिळाला असून, या भागामध्ये अद्यापही बचावकार्य सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. (Dombivli MIDC Blast )
(हेही वाचा –Mount Everest वर चढाई करणार्या पहिल्या भारतीय महिला कोण होत्या? जाणून घ्या)
डोंबिवलीच्या अमुदान कंपनीत झालेला हा स्फोट (Dombivli MIDC Blast ) इतका मोठा होता की, 200 मीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्याचीही माहिती मिळाली. या स्फोटानंतर केजीएन केमिकल कंपनी, मेहता पेंट, सप्त वर्ण आणि एका शोरूममध्येही आग लागली होती. स्फोटाचं स्वरुप इतकं भीषण होतं की, यामध्ये 64 जण जखमी झाल्याची माहिती आहे. सदर घटनेनंतर जखमींना तातडीनं डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर नेपच्यून हॉस्पिटलमध्ये 15 जणांवर उपचार सुरु असून त्यातील चारजणांवर अतिदक्षताविभागात उपचार सुरु असल्याचंही सांगण्यात येत आहे. (Dombivli MIDC Blast )
हेही पहा –
Join Our WhatsApp Community