school syllabus: आता शालेय अभ्यासक्रमांत मनाचे श्लोक, भगवद्गीता आणि बरंच काही…

217
school syllabus: आता शालेय अभ्यासक्रमांत मनाचे श्लोक, भगवद्गीता आणि बरंच काही...
school syllabus: आता शालेय अभ्यासक्रमांत मनाचे श्लोक, भगवद्गीता आणि बरंच काही...

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (National Education Policy) राज्याचा शालेय अभ्यासक्रम (school syllabus) आराखडा ‘एससीईआरटी’ने जाहीर केला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. नव्या शैक्षणिक धोरणात देशातील पारंपरिक, प्राचीन ज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी भारतीय ज्ञानप्रणाली या घटकाचा समावेश करण्यात आला आहे. राज्याच्या आरखड्यातही प्रत्येक विषयांच्या अभ्यासक्रमांत भारतीय ज्ञानप्रणालीवर आधारित घटकांचा समावेश करण्यात यावा, अशी सूचना देण्यात आली आहे. (school syllabus)

भारतीय ऋषींची दीनचर्या कशी होती?

तिसरी ते पाचवीपर्यंत एक ते २५ मनाचे श्लोक, सहावी ते आठवीसाठी २६ ते ५० मनाचे श्लोक आणि नववी ते बारावीसाठी भगवद्गीतेतील बारावा अध्याय यांचे पाठांतर करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात यावी, अशी सूचना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भगवद्गीतेतील (Bhagavad Gita) ज्ञानयोग, आत्मज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी. (school syllabus) भारतीय ऋषींची दीनचर्या कशी होती? आहार कसा होता? गुरुशिष्य परंपरा यांचीही ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. विज्ञान, गणित या विषयांमध्येही भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश करण्याचे आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. (school syllabus)

विद्यार्थ्याने गैरवर्तन केल्यास शाळेतून कायमची हकालपट्टी?

आराखड्यात एकीकडे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे शारीरिक किंवा मानसिक हिंसेचा अनुभव येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, त्याच वेळी विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवेश रद्द करण्याचीही मुभा देण्यात आली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार १४ वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकता येत नाही. मात्र, अभ्यासक्रम आराखड्यात कायद्याशी विसंगत सूचना देण्यात आल्याचे दिसून येते. शालेय प्रक्रिया या घटकांत वादविवादांचे निराकरण, शिस्त यांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. एखाद्या विद्यार्थ्याने गैरवर्तन केल्यास शाळेतील प्रवेश रद्द करणे, शाळेतून कायमची हकालपट्टी करणे किंवा कायमचा प्रवेश रद्द करणे असे टोकाचे निर्णय सूचवण्यात आले असले तरी त्यापूर्वी पालक आणि विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात यावे आणि विद्यार्थ्यांप्रति दयाळूपणा, क्षमाभावना असावी, असे नमूद करण्यात आले आहे. (school syllabus)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.