Lok Sabha Election 2024: “…तर निवडणूक आयुक्तांचा मर्डर करेन”, काँग्रेस मंत्र्याची उघड धमकी

282
Lok Sabha Election 2024:
Lok Sabha Election 2024: "...तर निवडणूक आयुक्तांचा मर्डर करेन", काँग्रेस मंत्र्याची उघड धमकी

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) निकालाबाबत काँग्रेसचे माजी मंत्री सुबोध सावजी (Subodh Savji) यांनी थेट निवडणूक आयोगाच्या (Election Commission) मुख्य निवडणूक आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी, जिल्हा परिषदेतील अधिकारी यांना मर्डरची धमकी मागच्या काळात दिली होती. आता पुन्हा त्यांनी थेट देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांचाच गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Lok Sabha Election 2024)

“निवडणूक आयुक्तांचा गळा घोटणार”

“राज्यासह देशभरात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात 48 पैकी 40 जागा या महाविकास आघाडीला मिळणार आहेत, अशी स्थिती असताना निवडणूक आयोगाने जर ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला, तर आपण त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील सर्व मतदारांच्या वतीने मी आपला मर्डर करेन. निवडणूक आयुक्तांचा गळा घोटणार.” अशी थेट धमकीच सुबोध सावजी यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना दिली आहे. (Lok Sabha Election 2024)

“लोकसभेच्या जागा या महाविकास आघाडीच्या येणारचं”

“लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात असलेला मतदाराचा कौल हा महाविकास आघाडी या पक्षांकडेच आहे. या आधारे एकूण ४८ जागापैंकी ३८ ते ४० लोकसभेच्या जागा या महाविकास आघाडीच्या येणारचं, परंतु जनतेच्या आणि माझ्या मनात संशय आहे की, आपण ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करुन लोकांच्या मतदानाचा लोकशाहीचा गळा घोटणार आहात. असे घडल्यास महाराष्ट्रातील मतदारांच्या वतीने या अन्यायाच्या विरोधात मी आपला गळा घोटल्याशिवाय राहणार नाही.” असं सुबोध सावजी म्हणाले आहेत. (Lok Sabha Election 2024)

काँग्रेसवाले आपली लायकी का दाखवतात वारंवार???

सुबोध सावजी यांनी केलेल्या टीकेचा आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी समाचार घेतला आहे. “काँग्रेसवाले आपली लायकी का दाखवतात वारंवार???” असं म्हणत त्यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. अतुल भातखळकर म्हणाले, “काँग्रेसवाले आपली लायकी का दाखवतात वारंवार??? महाविकास आघाडीचा एक ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुबोध सावजी हे देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांचा खून करण्याची जाहीर धमकी देतात आणि महाविकास आघाडीचे सगळे नेते मूग गिळून नुसता तमाशा बघत राहतात…” असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.