T20 World Cup, Ind vs Pak : भारत – पाक सामन्याचं एक तिकीट २०,००० डॉलरला?

T20 World Cup, Ind vs Pak : भारत वि पाकिस्तानचा सामना ९ जूनला न्यूयॉर्क इथं होणार आहे 

179
T20 World Cup, Ind vs Pak : भारत - पाक सामन्याचं एक तिकीट २०,००० डॉलरला?
T20 World Cup, Ind vs Pak : भारत - पाक सामन्याचं एक तिकीट २०,००० डॉलरला?
  • ऋजुता लुकतुके

१ जूनपासून आयसीसी टी-२० विश्वचषक (T20 World Cup, Ind vs Pak) स्पर्धेला सुरुवात होणार असली तरी सगळ्यांचं लक्ष ९ जूनला होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याकडेच आहे. पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील ही लढत क्रिकेट विश्वात सगळ्यात जास्त पाहिला जाणारा क्रिकेट सामना असतो असं इतिहास सांगतो. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकातही या सामन्याची चर्चा सुरू झाली आहे. आणि न्यूयॉर्कच्या रसॉ स्टेडिअमवर होणाऱ्या या सामन्यासाठी तिकीट विक्रीही सुरू झाली आहे. (T20 World Cup, Ind vs Pak)

(हेही वाचा- IPL 2024, M. S. Dhoni : धोनी पुढील हंगामात खेळेल असा चेन्नई फ्रँचाईजीला विश्वास)

त्याचवेळी आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी तिकिटांच्या किमतीवरून आयोजकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. क्रिकेटच्या प्रसाराला प्राधान्य देण्याऐवजी या सामन्याची डायमंड क्लब तिकिटं २०,००० अमेरिकन डॉलर (American Dollar) (१,१६,००० रुपये) विकली जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. ‘टी-२० विश्वचषकाची भारत – पाक (T20 World Cup, Ind vs Pak) सामन्याची तिकिटं डायमंड क्लबसाठी २०,००० अमेरिकन डॉलरला विकली जात असल्याचं बघून मला धक्काच बसला. अमेरिकेत होत असलेली ही स्पर्धा क्रिकेटच्या प्रसारासाठी आहे. त्यातून फक्त नफा कमावण्याचं उद्दिष्टं आयसीसीने ठेवू नये,’ असं मोदी यांनी ट्विट केलं आहे. (T20 World Cup, Ind vs Pak)

New Project 41

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, भारत – पाक सामन्याची तिकिटं ही ३०० अमेरिकन डॉलरनी सुरू होतात. आणि सर्वात जास्त किंमत १०,००० अमेरिकन डॉलर इतकी आहे. पण, तिकिटांची पुनर्विक्री (रिसेल) सुरू झाली असून तो भाव २०,००० डॉलरच्या पलीक़डे गेला असण्याची शक्यता अमेरिका टूडे वाहिनीनेही व्यक्त केली आहे. (T20 World Cup, Ind vs Pak)

(हेही वाचा- Sindhudurga Boat Accident : मच्छिमारांसाठी बर्फ घेऊन जाणारी बोट पलटली, दोन जणांचा मृत्यू तर दोन जण बेपत्ता)

भारतीय संघ आपला पहिला सामना ५ जूनला आयर्लंड विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर ९ जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना होईल. त्यानंतर अमेरिका आणि कॅनडा विरुद्धचे सामने होतील. भारताचे साखळीतील चारही सामने अमेरिकेत न्यूयॉर्क इथं होणार आहेत. प्रत्येक गटातून प्रत्येकी दोन संघ सुपर ८ मध्ये जातील. तेव्हापासून सामने वेस्ट इंडिजमध्ये होतील. (T20 World Cup, Ind vs Pak)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.